Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जुलै, २०१९

प्रसिद्धी आणि पैसा म्हणजे यश असे चुकीचे समीकरण लोकांच्या डोक्यात आहे ..(पंकज पाटील )



कठीण काळात स्वतःच्या मनावरचा ताबा न जावू देता योग्य भुमिका घेणारे ,चांगले ध्येय असलेले,प्रामाणिकपणे वागणारे आणि नेहमी चांगला विचार करणारे असे व्यक्तिमहत्त्व सर्वांच्या लक्षात राहते 

पद,प्रतिष्ठा आणि पैसा असणारी व्यक्ती नेहमीच आपल्यापेक्षा पुढे आहे ,अधिक चांगले आयुष्य जगते आहे ,अधिक प्रगती केली आहे असे वाटत राहते .पण प्रगती कशाला म्हणायचे  हाही मुद्दा आजच्या काळात महत्वाचा आहे.


एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे.एषोआरामाची जिंदगी हवी म्हणून तो रोज दारू पीत असेल,सिगारेट ओढत असेल आणि त्याचा  सारा वेळ स्वतःच्या व्यसनाचा आनंद घेण्यात जात असेल ,तर अश्या व्यक्तीला आपण त्याने प्रगती साधली असे म्हणू शकतो का ? प्रगती फक्त पैश्यांची नसते ,ती बुद्धीची ,वृत्तीची 

,विचारांची असते.व्यक्ती स्वतः बरोबर इतरांचा विचार करतोय का, स्वतः कष्टाने कमवलेल्या पैश्यांचा विनियोग योग्य पद्धतीने करतोय, पैसा इतर कुणाचेही शोषण न करता कमावतोय का या सगळ्याचा एकत्रित विचार प्रगतीत असला पाहिजे .त्याला खऱ्या अर्थाने प्रगती आणि यश म्हटले पाहिजे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध