Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जुलै, २०१९

शिरपूरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना वाळू माफियांची बेदम मारहाण



शिरपूर :(प्रतिनिधी)  शहराच्या शहादा टी पॉईंटवर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी विक्रम बादल हे कार्यालयात जात असताना अवैध वाळू वाहतुकदारांनि  प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांना बेदम मारहाण केली . 

प्रांताधिकारी मारहाण झालेल्या स्थितीत महसूल अधिकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाले  .घटनेच्या निषेधार्थ शिरपूर व शिंदखेडा उपविभागातील महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.शिरपूर पोलिसांनी प्रांताधिकारी विक्रम बादल यांना  वैद्यकीय तपासणीसाठी 

उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.  दरम्यान  आरोपींचा शोध घेतला जात असून पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे हे फौजफाट्या सह शिरपूर ला रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध