Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जुलै, २०१९
अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप
मा.आ.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनास मोठे यश मिळाले असून आज रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील व प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नोव्हेंबर २०१७ पासून नगरपरिषदेस निवेदन देऊन दिव्यांग बांधवांसाठी ३%निधी राखीव ठेवून तो दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा. यासाठी आंदोलन व लेखी तक्रारी अमळनेर नगरपालिकेत केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी या दिव्यांग विषयाचे गांभीर्य बघता नगरपरिषदेस मार्गदर्शन करत लोकनियुक्त नगर अध्यक्षा मा.सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील व मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर यांनी सकारात्मक चर्चा करून चालू वित्तीय वर्षा साठी १३४ लाभार्थींना प्रत्येकी ७००० प्रमाणे ९ लाख ३८ हजार रुपये लाभार्थी बँक खात्यात जमा करून जळगाव जिल्ह्यातील 2 दुसऱ्या क्रमांकावर अमळनेर च्या इतिहासात पहिल्यांदा अपंग निधी वाटप करण्यात आला.
अपंग हिताच्या या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील, मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर , संजय चौधरी , प्रहार तालुकाध्यक्ष पंकज पाटील , प्रहार शहराध्यक्ष योगेश पवार तालुका अध्यक्ष दीपक पाटील,धुळे
जिल्हाध्यक्ष शशिकांत सुर्यवंशी , धुळे प्रहार सह खजिनदार व धुळे शहर अध्यक्ष अड कविता पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा