तुळजापूर :प्रतिनिधी (विशाल डुकरे )
काल तुळजापूर येथील घडलेली घटना, बायपास रोड पासून जात असलेल्या एका व्यक्ती अचानक रस्ता मध्ये कोसळून खाली पडला त्याचे अंग थरथर कापू लागले हे पाहता रोड जवळ नेहमी प्रमाणे लोकांची गर्दी होऊ लागली. तर काही लोक त्याला पाहून पुढे जात होते. तेवढ्यात आरंभ संस्थेचे सदस्य आयुब शेख तेथून जात असताना ही गर्दी का झाली आहे हे
पाहण्यासाठी गेला तो व्यक्ती तडफडत पडला असल्याचे निदर्शनास आले, त्याला हा प्रकार समजला त्या व्यक्तीला फिट्स आल्याचे लक्षात येताच त्याने त्या पिढीताला उचलुन रस्त्यावरून साईडला घेतलं, फिट आलेल्या व्यक्तीच्या नाकाला उग्रवास लावल्यास त्याच्या फिट्स बंद होऊन तो शुद्धीवर येऊ शकतो याची जाण आयुब शेख यांना होती, त्यानुसार त्याला उग्रवसाची कुठलीही वस्तू मिळेना शेवटी त्याने एका व्यक्तीची चामड्याची चप्पल काढून त्या पीडित व्यक्तीच्या नाकाला
लावली, पण त्याने खूप काही फरक पडत नसल्याचे पाहताच सोबत असणाऱ्या व्यक्तीला समोर दिसत असलेल्या हॉटेल मध्ये कांदा आणायला सांगितले व त्या व्यक्तीला प्रथमोपचार दिला आणि त्या व्यक्तीला होत असलेला त्रास कमी झाला अन उपचारासाठी त्या व्यक्तीला दवाखान्यात पाठवून दिले.
हा सर्व प्रकार घडत असताना तिथे जमलेले लोक केवळ प्रेक्षक बनून थांबलेले होते तर काही जण मोबाईल वर व्हिडीओ, फोटो काढण्यात धन्यता मानत होते यातून एक प्रश्न निर्माण होतो की आज-काल माणुसकी नाहीशी होत चालली आहे का ? गर्दी
करणारे लोक हा सर्व प्रकार फक्त कुतूहलाने पाहत होते. पण आज आपल्या आरंभ संस्थेचा सदस्य तिथे नसता तर त्या व्यक्तीचे काय झाले असते ? कदाचीत तिथलं चित्र वेगळचं असत..
माणसाने माणुसकी न विसरता प्रत्येक व्यक्तीला मदत करावी हा माणुसकीचा धर्म अन कर्तव्य आहे, रस्त्यात अशा प्रकारे काही प्रसंग आला किंवा कोणाचा अपघात झाला तर तिथं आपण आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या व्यक्तीला आवश्यक अशी मदत करावी असे आवाहन आरंभ सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा