Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ एप्रिल, २०२६
दिंडोरी पोलिसांची मोठी कारवाई : ७१ लाखांचा अवैध गुटखा व तंबाखू जप्त
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७१,८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार,दिंडोरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि.५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १२:३० वाजेच्या सुमारास पेठ-नाशिक महामार्गावरील चाचडगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला होता.यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या टाटा कंटेनर (MH 05 AM 1821) या वाहनाला अडवून तपासणी केली असता,त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या कारवाईत ५१,७८,४०० रुपयांचा गुटखा व तंबाखू साठा तसेच अंदाजे २० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ७१,८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.हा माल गुजरात राज्यातून कर बुडवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.या प्रकरणी
मारुती रभाजी वाळुंज (वय ५३, रा. पिंपळवंडी, ता.जुन्नर, जि.पुणे) – चालक याला अटक करण्यात आली असून गणेश सुमंता वाघोळे (रा.जुन्नर,जि.पुणे) – वाहन मालक फरार आहे.
सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १२३, २७४, २७५, २२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण भिसे,विक्रांत मांगडे,प्रमोद मंडलिक,मिलिंद पाटील,हरिश्चंद्र पालवी,बजरंग कहाटे,बाळासाहेब पानसरे,मोठाभाऊ बच्छाव चव्हाण गवारे, गांगोडे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा