Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

दिंडोरी मध्ये एर्टिका कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू.



संदीप अवधूत :-

​दिंडोरी येथील खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरात असलेल्या शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व तीन पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. क्रेनच्या साहाय्याने रात्री ही कार बाहेर काढण्यात आली.
​दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात राजे बॅक्वेट हॉल व मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी खासगी क्लासतर्फे स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिंडोरी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री दहा वाजता स्नेहसंमेलन संपल्यानंतर इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील सदस्य एर्टिगा कारने घरी परतण्यासाठी निघाले. त्यावेळी मंगल कार्यालय परिसरातील शेतातील एका विहिरीत त्यांची कार कोसळली.या घटनेची माहिती समजल्यानंतर दिंडोरी नगरपंचायतीचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, तहसीलदार मुकेश कांबळे व दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध