Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ जुलै, २०१९

दुष्काळाचं सावट दूर दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम होऊ दे म्हणून तुळजाभवानीला साखळी




गृहनिर्माण मंत्री विखे पाटील  कुटुंबासहित भेटले दर्शन

उस्मानाबाद :प्रतिनिधी (विशाल डुकरे) भाजपात काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते येण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे येणराची संख्या किती आहे हे  सांगता येणार नसून पुढील काळात सगळ्यांना आश्चर्य होईल असे  प्रवेश  होतील मी कधीच देशाच्या काँग्रेस 

नेतृत्वावर नाराज नव्हतो तर राज्याच्या नेतृत्वावर मी नाराज होतो जर त्यांनि माझं ऐकलं असते तर ही वेळ आली नसती आता चिंतन करण्याची वेळ निघून गेली असल्याचा टोला ही त्यांनी कॉंग्रेस नेत्यांना लगावला आहे लोकसभेचे निकाल अगदी बोलके आहेत त्यामुळे च 

काँग्रेस राष्ट्रवादी मधील अनेक नेते मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्या संपर्कात असल्याने कोणालाही नो एन्ट्री चा बोर्ड नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले विखे पाटील आज सपत्नीक तुळजाभवानी च्या दर्शनासाठी तुळजापूर मध्ये आले होते 

राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येवो व राज्य दुष्काळ मुक्ती होवो या  तुळजाभवानीला साकडे घातले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध