Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जुलै, २०१९

सावळदे केंद्रांतर्गत केळी,अंडी वाटप





शिरपूर :कुरखळी प्रतिनिधी(योगेश्वर मोरे)

दुष्काळी भागासाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत गटशिक्षणाधिकारी तथा अधिक्षक शालेय पोषण आहार श्री. प्रकाशजी रणदिवे सर यांच्या मार्गदर्शना खाली शिरपूर तालुक्यात मध्यान्ह भोजना सह पूरक आहार वाटप कराण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सावळदे केंद्रांतर्गत कुरखळी, सावळदे, खर्देपाथर्डे, बाभूळदे, गिधाडे, 

जैतपूर, ताजपूरी, आढे व पिंप्री जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुमावत, केंद्रप्रमुख एम. बी. देवरे यांच्या उपस्थितीत व नियोजनाखाली आठवड्यातून सोमवार,बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी पूरक आहार म्हणून केळी व अंड्यांचे वाटप केले जात आहे. कुरखळी मुख्याध्यापक 

रघुनाथ गित्ते, सावळदे मुख्याध्यापक संजय तमखाने, खर्देपाथर्डे मुख्याध्यापक योगेश पाटील. बाभूळदे मुख्याध्यापक भरत पवार, गिधाडे मुख्याध्यापक वसंत कोळी, ताजपूरी मुख्याध्यापक रविंद्र सोळंकी. जैतपूर मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील. आढे मुख्याध्यापक सुरेश माळी. पिंप्री 

मुख्याध्यापक रविंद्र वाघ यांच्या सह शिक्षक योग्य पध्दतीने पूरक आहार वाटप करत असल्याने केंद्रप्रमुखांनी समाधान व्यक्त करत शिक्षकांचे कौतुक केले आहे.

प्रतिनिधी योगेश्वर मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध