Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जुलै, २०१९

जागर फाऊंडेशन तर्फे वाशी शहर व ग्रामीण भागातील पंधरा शाळांमधील निराधार व गरजू अशा होतकरू विद्यार्थ्यांना अन्नपूर्णा मंगल कार्यालय

 

वाशी: प्रतिनिधी (विशाल डुकरे ) वाशी येथे शालेय साहित्याचे(दप्तर,वही     पेन,कंपास,कलरपेटी) वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख आथिती म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंढे मॅडम यांची उपस्थित लाभली तसेच  प्रोबेशनरी आय ए एस  विवेक जॉन्सन,डेप्युटी कलेक्टर कांबळे साहेब,तहसीलदार संदीप राजापुरे,शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ चे माजी सचिव जयकुमार शितोळे, बालसंस्कार 

प्रा.विद्यामंदिर वाशी चे मुख्याध्यापक माने सर व सर्व शाळांमधील शिक्षक,विद्यार्थी आणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमास जागर फाऊंडेशन ला सहकार्य करणारे उस्मानाबाद शहरातील समाधान देशमुख सर विष्णू देशमुख सर आणी भराटे सर आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हाधिकारी मॅडम यांनी मार्गदर्शन करताना जागर फाऊंडेशन राबवत  असलेल्या शालेय साहित्य वाटप,वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,इकोफ्रेंडली गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबीर,अशा विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले  गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यास इतरांशी तुलना न करता विशेषसच समजावे,शिक्षक पालक समन्वय साधून विद्यार्थी गुणवत्ता वाढवावी असा सल्ला दिला.

तसेच जागर फाऊंडेशन च्या पुढील कार्यास शुभेच्छा देतानाच सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या उपक्रमाचा भाग म्हणून उपस्थित असलेल्या निवासी मूकबधिर विद्यालय वाशी या शाळेच्या मूकबधिर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना जिल्हाधिकारी मॅडम भारावून गेल्या.

या प्रसंगी बोलताना जागर फाऊंडेशन चे सदस्य श्रीकांत जाधव यांनी समाजामध्ये गरजू निराधार भरपूर आहेत,तसेच सामाजिक हित जपणारे दानशूर ही आहेत यांचा समन्वय साधन्याचे काम आमचे फाऊंडेशन करत आहे.फाऊंडेशन ला सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठेवण्याचा प्रामाणिक प्रयन्त आम्ही करू तसेच पुढील काळात ही संपूर्ण उपक्रमात पारदर्शकता ठेवून जास्तीत जास्त वंचितापर्यंत पोहोचण्याचा प्रयन्त करू आसा शब्द दिला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागर फाऊंडेशन चे सदस्य वैभव गरड,गणेश गळकाटे,श्रीकांत जाधव,निलेश बागल,मुकुंद घाटगे,शीतल देशमुख,गणेश उंबरे,रुपेश जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध