Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विध्यापीठाची फिरती विज्ञान प्रयोग शाळा लॅब आॅन व्हील! खेडोपाडी विज्ञान-तंत्रज्ञानाची जागृती....
माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विध्यापीठाची फिरती विज्ञान प्रयोग शाळा लॅब आॅन व्हील! खेडोपाडी विज्ञान-तंत्रज्ञानाची जागृती....
सोलापूर- प्रतिनिधी विज्ञान-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार व्हावा, शहरासह ग्रामीण भागातील माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनाही विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रयोग करता यावे तसेच यासंदर्भात प्रत्यक्षात प्रॅक्टिकल ज्ञान घेता यावे, यासाठी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'फिरती विज्ञान प्रयोगशाळे'चा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. 'लॅब ऑन व्हील' असे या उपक्रमाचे नाव असून विद्यापीठाच्या वर्धापन दिनी म्हणजे 1 ऑगस्ट 2019 रोजी मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.
डॉ. मृणालिनी फडणवीस या कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून विद्यापीठाकडून नव-नवे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचबरोबर विद्यापीठातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असून विद्यापीठ विकासाच्या वाटेने मार्गक्रमण करीत असताना पाहावयास मिळत आहे. आता माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी
विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज सेंटरच्यावतीने फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी एक स्वतंत्र वाहन असणार असून या वाहनाच्या माध्यमातून
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच विज्ञानाचे विविध मॉडेल्स अभ्यासण्याचीही संधी दिली जाणार आहे. विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती देतील.
जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या चार विषयांबद्दल विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासंदर्भात या वाहना मध्ये प्रत्यक्ष प्रयोग करण्याची सोय असणार आहे. तसेच त्याविषयी विविध मॉडेल्स असणार आहेत. त्यामुळे संबंधित विषयाबद्दल अधिक ज्ञान माध्यमिक
शाळेच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज सेंटरचे संचालक डॉ. सुहास धांडे यांनी दिली. यामुळे माझी विद्यार्थी-विद्यार्थिनींना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.
1 ऑगस्ट 2019 रोजी या वाहनाचे उद्घाटन झाल्यानंतर संपुर्ण शहर व जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये हे वाहन जाणार आहे आणि तेथील विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे डॉ. धांडे यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा