Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १९ जुलै, २०१९
काम चुकार तलाठी सौ. राही सोणवने यांना निलंबित करा— शिवसेनेची मागणी
अहमदपुर. प्रतिनिधी (गजानन अनंतवाळ) गंगाहिप्परगा सज्याच्या तलाठी सौ. राहि सोणवने या तलाठी सज्यावर न जाता शहरातील नगरपालिका परीसरातील काँपलॅक्स मधील खाजगी कार्यालयातून काम पाहतात, मागील दोन दिवसापासून सौ.सोणवने या कार्यालयाकडे फिरकल्याच नाहीत सध्या विमा भरण्यासाठी
शेतकर्यांना ७/१२ व ८अ ची आवश्यकता लागत आहे, अन्यथा पिक विमा भरण्यापासुन शेतकर्यांना वंचित राहावे लागेल, त्यांनी थाटलेल्या खाजगी आॅफिस समोर सज्यातील गंगाहिप्परगा, रुद्धा, सुनेगाव, शेंद्री, बेंबडेवाडी या गावातील शेकडो शेतकरी दिवसभर रांगेत उभे राहून सायंकाळी परत जात आहेत, कार्यालयाकडे हेलपाटे मारणार्या शेतकर्यांना सौ. राही सोणवने यांचे पती अश्लील शिवीगाळ करुन हाकलून देतात, अशा काम चुकार तलाठी सौ. राही सोणवने यांना तात्काळ निलंबीत करुन शेतकर्यांना ७/१२ व ८अ देण्याची व्यवस्था करावी अन्यथा
शिवसेनेच्या वतिने शेतकर्यांची अडवणूक करणार्या तलाठी सौ. राही सोणवने यांच्या विरुद्ध अंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेच्या वतिने मा. तहसिलदार सौ. अरुणा संगेवार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, तालुका उपप्रमुख अनिकेत फुलारी, सुभाष गुंडिले, विशाल दहिफळे, शिवराज थगणर, पांडूरंग मंदवाड, ओम जायभाये, सुमन नागरगोजे, वैजनाथ साबळे, सचिन केंद्रे, भागवत यलमटे, गंगाधर चंदेवाड, नारायण पोले, महानंदा सुरनर, अशोक कासले, लता केंद्रे,
यमुनाबाई नागरगोजे, सुमन नागरगोजे, कौशाबाई पोले, रतनबाई केंद्रे, सुंदराबाई शिंदे, कमल साबळे,श्रीपती केंद्रे, गुरलिंग काडवदे यांच्यासह अन्य शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा