Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ जुलै, २०१९

रावेर तालुक्यात वृक्ष लागवड महोत्सवास प्रारंभ



न्यायाधीशांनी केली सुरवात 

रावेर प्रतिनिधी :(अजीज शेख )

तालुक्यात महाराष्ट्र शासन वन विभागाकडून एकच लक्ष 33 कोटी वृक्ष या मोहिमेस सुरवात झाली असून रावेर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीश यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला 

यावेळी न्यायाधीश आर एल राठोड, सह न्यायाधीश आर एम लोळगे यांच्या हस्ते न्यायालय परिसरात बेलाचे वृक्ष लावण्यात आले. प्रास्ताविकात वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील वृक्ष लागवड मोहीम आणि त्यासाठी तयार कृती आराखडा याविषयी सविस्तर माहिती दिली. 

न्या आर एल राठोड यांनी मनोगतात वृक्ष आणि मानवी जीवन या विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमास माऊली फौंडेशन अध्यक्ष डॉ संदीप पाटील, कोर्टातील 

सह अधीक्षक एस एम पाटील, सह अधीक्षक सौ के डी भावसार स्टेनो एस एस कुलकर्णी, वरिष्ठ लिपिक ए वाय पठाण , एस के नारखेडे, पी एस निंभोरकर, एच एच कुलकर्णी, लिपिक डी एच धिवरे, ए वाय 

पाटील, एम पी वाणी, वाय एस वैद्य, पी पी वानखेडे, डी डी बारी आदी मान्यवर व सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे यांनी केले तर आभार वनपाल यशवंत पाटील यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध