Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ जुलै, २०१९
निंभोरा गाव ग्राम विस्तार अधिकारी व तलाठी यांचे गैरहजेरी ने त्रस्त
रावेर :प्रतिनिधी (अजीज शेख )
निंभोरा बु। ता रावेर निंभोरा हे गांव सुमारे १५ हजार लोकसंख्येच्या दरम्यान असून येथे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी ,शेतकरी यासह विविध क्षेत्रातील लोक मोठया प्रमाणात आहे परंतु येथील ग्रामविकास अधिकारी गणेश पाटिल व तलाठी समीर तडवी हे दोघ सतत दुर्लक्ष करून निंभोरा येथे ग़ैरहजर राहतात यामुळे निंभोरा येथील जनतेचे शेतकऱ्यांचे मजुर वर्गाचे व शालेय विद्यार्थ्यांचे कामास
खोळंबा होतो .कोणाला उत्पन्ना चा दाखला ,शेती उतारे, प्लाट उतारे, शासकीय योजना कोणत्या, कशा याबाबत जनतेस माहिती मिळत नाही म्हणून सर्व जनता त्रस्त झाली आहे तरी रावेर तहसीलदार व रावेर पंचायत समिति गटविकास अधिकारी यांनी कायम स्वरूपी तलाठी व ग्रामविकास अधिकारी नेमणुक करावी व जनतेची गैर सोय दूर करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा भाजपा शहर अध्यक्ष व ग्रा पं सदस्य प्रभाकर शंकर सोनवणे
यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे
नियमित मी निंभोरा गावातच -तलाठी तडवी
तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले रावेर येथे शासकीय कामे सुरु असून यामुळे मी दररोज सकाळी १०ते२ वाजे पर्यंत निंभोरा येथे थांबुन नंतर रावेर येथे शासकीय कामकाज साठी जात असतो असे तडवी यांनी सांगितले
मंगळवार पासून सुरळीत येणार ग्रामविकास अधिकारी गणेश पाटिल
गेल्या १५दिवसांपासून रावेर येथे पंचायत समिति, तहसील कार्यालयात १५ ते १७मीटिंग झाल्याअसल्याने यात पंतप्रधान पिक योजना ,घरकुल योजना ,यासह आदि योजनांच्या संदर्भात मिटिंगा सुरु होत्या यामुळे निंभोरा येथे हजर राहता आले नाही व निंभोरा सह निंबोल चा ही कार्यभार आहे यामुळे ही हजर राहता आले नाही परंतु (मंगळवार)निंभोरा येथे सतत हजर राहून कामकाज सुरुळीत राहिल असे ग्रामविकास अधिकारी गणेश पाटिल यांनी बोलतांना सांगितले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा