Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ जुलै, २०१९

विश्वास, मेहनत आणि काटकसर हेच व्यवसायातील यशाचे गमक - श्रीराम पाटील




रावेर :प्रतिनिधी (अजीज शेख )
व्यवसाय लहान असो वा मोठा तो करत असतांना ग्राहकांचा विश्वास, आणि व्यावहारिक काटकसर ही त्रिसूत्री आपण अंगिकारल्यास आपल्याला यश नक्कीच मिळते असे मौलिक मार्गदर्शन करतांना श्रीराम उद्द्योग समूहाचे संचालक श्रीराम पाटील यांनी रावेर येथे बचत गटाच्या महिलांना सांगितले



रावेर पंचायत समिती येथे शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उदद्योजकता विभागाकडून आयोजित हिरकणी नवउदद्योजक महाराष्ट्राची या मार्गदर्शन मेळाव्यात गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख मार्गदर्शक श्रीराम पाटील हे होते प्रमुख उपस्थिती महिला आर्थिक विकास 

महामंडळ चे उल्हास पाटील, रावेर नपाच्या समुदाय संघटिका सौ रेखा नाईक तालुका व्यवस्थापक महेंद्र वाघ हे होते प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अंकुश 

जोशी यांनी हिरकणी नव उडद्योजक या विषयावर सांगून सविस्तर माहिती दिली
यावेळी जवळपास 100 महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध