Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ जुलै, २०१९

डॉ जितेंद्र ठाकूर यांची माहिती ,७९ गावातील ११ हजार १७८ वनपट्टे दावे मंजूर,




शिरपूर:-प्रतिनिधी  शिरपूर तालुक्यात ७९ गावातील ११ हजार १७८ वनजमिनीचे वनपट्टे दाव्याला मंजूरी मिळाली आहे.यामुळे तालुक्यातील वनपट्टेसाठीचा असलेला मोठ्या संघर्षाला यश प्राप्त झाल्याची माहिती डॉ जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.




तालुक्यातील आदिवासी भागात वनजमिनीच्या वनपट्यांना मंजुरी मिळावी यासाठी येथील जनता संघर्ष करत होती.गेल्या कित्येक वर्षांपासून यासाठी संघर्ष सुरु होता मात्र कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हते. अखेर याबाबत भाजपाचे डॉ जितेंंद्र ठाकूर व राहुल रंधे यांनी वनपट्यांंसाठी पाठपुरावा केला होता.टप्या टप्याने या वनपट्यांच्या दावेंना मंजुरी देण्यात आली.गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांच्या वनपट्टे दावे मंजुरी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता

मात्र याबाबत जिल्हास्तरीय कमिटीने या वनपट्टे दाव्यांना मंजुरी दिली आहे.२०१९ पर्यंत शिरपूर तालुक्यातील ७९ गाव व पाड्यातील ११ हजार १७८ शेतकऱ्यांना वनजमिनीची मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी दिली.पावरा भिल आदिवासी संघर्ष समितीचे रेवा पावरा,कन्हैयालाल पावरा,शिवदास भिल,

हेमराज राजपूत,बालकिसन पावरा,दिनेश पावरा,अत्तरसिंग पावरा आदींनी यासाठी अनेकदा निवेदन व आंदोलन केली होती.

यात   तालुक्यातील फत्तेपुर, जोयदा,मालकातर,खंबाळे,वरझडी,कनेरपाडा,शिमल्या,वकवाड,बुडकी चिचपाणी,हडाखेड आदी गावातील तिनशेच्या वर शेतकऱ्यांना वनजमीनीतील वनपट्याला मंजुरी देण्यात आली आहे.यासाठी अनेकदा निवेदन व आंदोलन करण्यात आले होते.या पुढे देखील प्रलंबित वनपट्टे धारकांना लाभ मिळवण्यासाठी संघर्ष व पाठपुरावा सुरु असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांंनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध