Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ जुलै, २०१९

नळदुर्ग पोलीस स्टेशनला मिळाला सिंघम ऑफिसर




तुळजापूर :(प्रतिनिधी विशाल डुकरे) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे पोलीसांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, उमरगाकडुन तुळजापूरकडे येणाऱ्या आयशर टेम्पो क्र. एम.एच. 03 सी.पी. 7714 मध्ये गुटख्याची वाहतुक होत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा.श्री आर.राजा पोलीस अधीक्षक, 

उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वानखेडे पोलीस स्टेशन,नळदुर्ग व त्यांच्या पथकाने गोलाई चौक नळदुर्ग येथे नाकाबंदी करुन उमरगाकडुन येणारा आयशर टेम्पो क्र. एम.एच. 03 सी.पी. 7714 ची 

तपासणी केली असता शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा 1000 गुटका, तंबाखु जन्य अन्न पदार्थाचा 26,35,200/- रुपयांचा साठा आयशर टेम्पोमध्ये आढळुन आलेने, आयशर टेम्पो क्र. एम.एच. 03 सी.पी. 7714 जुना वापरता किंमत अंदाजे 

20,00,000/-रुपये व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा 1000 गुटका, तंबाखु जन्य अन्न पदार्थाचा माल असा एकुण 46,35,200/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 1) रशिद महेबुब 

तांबोळी (वाहन चालक) 2) जमशीद रशीद तांबोळी दोघे रा.साकीनाका, तुंगा व्हीलेज, पवई मुंबई यांचेवर महाराष्ट्र राज्यात खरेदी, विक्री, साठा, वितरण व वाहतुक जवळ बाळगला तसेच लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन वरील दोन्ही 

आरोपीविरुध्द दिनांक 05.07.2019 रोजी पोलीस स्टेशन, नळदुर्ग येथे भा.दं.वि. कलम 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 26 (2) (i) (iv), 27 (2), 23 सहवाचन अधिनियम 2011 चे नियमन 2, 3, 4 नुसार विक्री साठी बंदीचे उल्लंघन दंडनिय कलम 59 (iv) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


नळदुर्ग पोलीस निरीक्षक वानखेडे यांनी नूतन  आलेल्या अनेक धडाकेबाज कारवाई केल्याने अवैध धंदा करणाऱ्या चे गुटका वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

अनेक धडाकेबाज कारवाई झाल्याने सिंघम ऑफिसर  असे जनतेतून बोलले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध