Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ जुलै, २०१९

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज – आ. हरिभाऊ जावळे



लालमाती येथे वन महोत्सवात झाली वृक्ष लागवड 

रावेर: प्रतिनिधी (अजीज शेख) 

पर्यावरणाचे संतुलन राखून मानवी हितासाठी आपण वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज असून आपण यासाठी स्वयंस्फूर्तीने पन्नास कोटी वृक्ष 

लागवड मोहिमेत सहभागी होवून याला वन महोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन आ. हरिभाऊ जावळे यांनी वन विभागाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले आहे. 



रावेर तालुक्यातील वन विभागाच्या लालमाती परिसरात वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी आ. हरिभाऊ जावळे हे होते तर प्रमुख उपस्थित अ.भा. केली उत्पादक 

महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, जी.प. माजी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, श्रीराम उद्योग समुहाचे संचालक तथा श्रीराम फौन्डेशन अध्यक्ष श्रीराम पाटील,  प.स. माजी उप सभापती पी.के.महाजन, उप वनसंरक्षक प्रकाश मोरणकर, 

प्रांताधिकारी अजित थोरबोले, सहाय्यक वन संरक्षक मधुकर नेमाडे, वन्यजीव विभागाचे रमाकांत भवर, वन प्रशिक्षण विद्यालय पाल येथील प्राचार्य श्री पाटील, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे, पोलीस 

निरीक्षक रामदास वाकोडे, फिरते पथक वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी.बी. बारेला, कृषी विज्ञान केंद्राचे श्री महाजन, सरपंच रजिया तडवी, वृक्ष मित्र अनिल नारखेडे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरमान तडवी, उप सरपंच गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रास्ताविकात सहाय्यक वन संरक्षक श्री नेमाडे यांनी यावल उप विभागातील गेल्या चार वर्षातील वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन याबाबत सविस्तर माहिती दिली. तर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी वृक्ष लागवड आणि रोजगार हमी योजना, वन कायदा याविषयी सविस्तर माहिती दिली.  पद्माकर महाजन यांनी देखील एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष या घोषणे द्वारा भाषण सुरु करून वन विभागाच्या प्रयत्नांना 

नागरिकांनी साथ देणे किती गरजेचे आहे त्याचे महत्व पटवून दिले. सुरेश धनके यांनी त्यांच्या शेतातील वृक्ष संवर्धन बाबत माहिती देवून त्याचे मिळणारे लाभ याविषयी अनुभव सांगून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बांधावर झाडे  लावणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात आ. श्री जावळे यांनी सांगितले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन मंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्या संकल्पनेतील पन्नास कोटी वृक्ष लागवड मोहिमेला 

मिळालेला प्रतिसाद आणि पर्यावरणाला मिळालेला लाभ याविषयी सांगून शासनाच्या वन विभागाच्या सविस्तर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीराम फौन्डेशन सचिव दीपक नगरे यांनी केले तर आभार रावेर वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी 

वनपाल संजय भदाणे, अतुल तायडे, अरविंद धोबी, रवी तायडे, संभाजी सूर्यवंशी, श्रीमती राणी काळे, सोपान बडगणे, सुनील महाजन यांच्यासह स्थानिक तलाठी, ग्रामसेवक आणि  सर्व वन कर्मचारी व वन मजूर यांनी परिश्रम घेतले. 

क्षण चित्रे  - 



- श्रीराम फौन्डेशन यांचे कडून वृक्ष लागवड करणाऱ्या व्यक्तींना आकर्षक टी शर्ट देण्यात आले. व ट्रीगार्ड देखील उपलब्ध करवून देण्यात आले. 

- वृक्ष लागवड प्रसंगी गावातील महिला, पुरुष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

- मागील चार वर्षात वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी केलेल्या कार्यासाठी आ. हरिभाऊ जावळे यांनी त्यांचा विशेष सन्मान केली. 

- वृक्ष लागवड कार्य्कार्म सुरु असतांना वरून राजाची दमदार हजेरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध