प्रतिनिधी :(विशाल डुकरे) उस्मानाबाद येथे आज दि.०६/०७/२०१९ रोजी शनिवार या दिवशी भारतीय जनसंघाचे प्रथम अध्यक्ष स्व.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त ‘संघटन पर्व - २०१९ सदस्य नोंदणी अभियानचा शुभारंभ दिनांक ०६
जुलै रोजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सदस्य नोंदणी अभियानाचे मराठवाडा प्रमुख नितीन काळे यांच्या ह्स्ते उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. हे सदस्य नोंदणी
अभियान ०६ जुलै ते ११ ऑगस्ट पर्त्यंत सुरु राहणार आहे. यावेळी, प्र.का. सदस्य अँड.मिलिंद पाटील, अँड.खंडेराव चौरे, अँड.अनिल काळे उपस्थित होते.
या अभियानास नोंदणी अभियानाचे जिल्हा प्रमुख संताजी चालुक्य, जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख,जिल्हा सह नोंदणी प्रमुख इंद्रजित देवकते, शहर नोंदणी प्रमुख अँड. प्रतीक देवळे, ग्रामीण नोंदणी प्रमुख भारत लोंढे, शहराध्यक्ष संदीप कोकाटे,जिल्हा
उपाध्यक्ष अँड नितीन भोसले,मीनाताई सोमाजी,सोशल मिडीयाचे संयोजक प्रवीण पाठक,मिडीया विभागाचे धनजंय रणदिवे,जयप्रकाश कोळगे,तानाजी पाटील,देवदत गोरे,डॉ गोविंद कोकाटे,जिवन देशमुख,जीवन वाटवडे,गजानन नलावडे,मंजुषा
कोकीळ,पूजा राठोड,रुपाली घाडगे, नगरसेवक बालाजी कोरे, दाजीआप्पा पवार,शंकर साळुंके,राहुल काकडे,मकरंद पाटील,गिरीश पानसरे यांच्या सह आदी मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा