Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ जुलै, २०१९

वृक्ष हेच खरे मित्र..किशोर बोरोले चिनावल




तालुका-प्रतिनिधी (अजीज शेख)  येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी संस्था चेअरमन किशोर बोरोले,संस्थाध्यक्ष किरण नेमाडे, सचिव गोपाळ पाटील,प्राचार्य शारदा 

बैरागी,पर्यवेक्षक माया बिऱ्हाडे, शिक्षक प्रतिनिधी पी.टी.सोनवणे, शिक्षकेतर प्रतिनिधी योगेश बोरोले या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात 

आले.विद्यालयातील स्काऊट व गाइडस यांना वृक्षांचे वाटप करून वृक्षसंवर्धनाची,वृक्ष वाढीची शपथ देण्यात आली. या उपक्रमांमध्ये इको क्लब चे सर्व स्काऊट गाईड सदस्य,हरित सेना प्रमुख एम.एस.महाजन,सुरज तडवी, 

पी.टी.सोनवणे,योगेश बोरोले,आर.ए. होले,जी.बी.चोपडे,पी.एम.जावळे, एन.एन.महाजन यांचे सहकार्य लाभले तर जाबीर तडवी,कन्हैया कंडारे, कविता सरोदे,यशवंत दुसाने,शेषराज भालेराव,मुबारक तडवी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध