Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ जुलै, २०१९
काम हीच माझी जात, काम हाच माझा धर्म - श्रीराम पाटील
रावेर प्रतिनिधी (अजीज शेख )
माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपल्याला जात आणि धर्म चिककविले जातात. पण माणुसकीचा धर्म कोणीही स्विकारायला तयार नाहीत ही शोकांतिका आहे. मी व्यावसायिक आहे कारण काम
हीच माझी जात असून काम हाच माझा धर्म असल्याचे प्रतिपादन श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा श्रीराम फौंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी वाघोड येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले
वाघोड येथील कुँवरस्वामी माजी विद्यार्थी परिषद वाघोड आणि श्रीराम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र विद्या मंदिर अध्यक्ष अरविंद पाठक हे होते प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष भगवान महाजन, संचालक नथ्थु महाजन, आय एस पाटील, पर्यवेक्षक बी एस मराठे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भारत महाजन, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे, श्रीराम ऑटो मॅनेजर संतोष महाजन, निलेश
महाजन, राजेंद्र मोपारी, मनोज पाठक, श्री पवार सर, संतोष महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीसाठी कुँवरस्वामी माजी विद्यार्थी परिषद वाघोड चे दिलीप महाजन , प्रशांत पाटिल,चेतन महाजन, विलास महाजन ,अतुल
महाजन,प्रदीप पाटील, यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी सर्व पदाधिकारी जि प मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप पाटिल व सर्व शिक्षक ,यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम
सुत्र संचालन नितिन माळी यांनी केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा