Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ जुलै, २०१९

शिंदखेड़ा तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून काम केल्याचा आनंद कायम स्मरणात राहील'




शिक्षणधिकारी मनिष पवार यांचे मनोगत




शिंदखेड़ा प्रतिनिधी(राहुल पाटील) शिंदखेड़ा तालुक्यात भूमिपुत्र म्हणून 3 वर्ष 10 महीने 23 दिवस सेवा केल्याचा आनंद कायम स्मरणात राहील असे मनोगत शिक्षणधिकारी मनिष पवार यांनी काल झालेल्या निरोप समारंभ कार्यक्रम मधे व्यक्त केले 

शिंदखेड़ा पंचायत समितीचे माजी गटशिक्षणधिकारी व धुळे जिल्हा परिषद चे शिक्षणधिकारी प्राथमिक मनिष पवार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम शिक्षक संघटना यांच्या वतीने घेण्यात आला 
              
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गटशिक्षणधिकारी एफ के गायकवाड़ होते तर व्यासपीठ वर 

निरोपअर्थी मनिष पवार,शिक्षण विस्तार अधिकारी ई बी आव्हाड,केंद्र प्रमुख संतोष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच ग स बँकेचे चेअरमन चंद्रकांत सत्तेसा,महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष नवीन चंद्र भदाणे यांची विशेष उपस्थिती होती 

           
कार्यक्रमच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले.त्या नंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश धात्रक यांनी केले या वेळी मनिष पवार यांच्या प्रति मनोगत मधे शिक्षण विस्तार अधिकारी ई बी आव्हाड,केंद्र प्रमुख संतोष चौधरी मनोज पाटील, कैलास ईशी,राहुल पाटील, संगीता मराठे,

ज्ञानेश्वर बाविस्कर,मनोज निकम,
मोहम्मद अंसारी, सतीश भुजबळ,रंजीत राठोड़ ,संजय बैसाने यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी निरोप समारंभ वेळी मनिष पवार यांनी सांगितले की शिंदखेड़ा तालुक्यात काम करतांना आनंद वाटला सर्वच शाळा डिजिटल,तंबाखू मुक्त शाळा, क्रिड़ा स्पर्धा मधे यशस्वी कामगिरी हे सर्व शिक्षक बांधव यांची मेहनत होय. तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून काम केल्याचा आंनद कायम स्मरणात राहील

या पुढेही शिक्षक बांधव यांनी जोमाने काम करून शिंदखेड़ा तालुक्याचे नाव उज्वल करावे जरी उच्च पदावर गेलो असलो तरि शिंदखेड़ा येथील शिक्षकाच्या समस्या सोडविन्या साठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही पवार यांनी दिली

अध्यक्ष स्थान वरुन एफ के गायकवाड़ यांनी मनोगत मधे गटशिक्षणधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिल्या बद्दल मनिष पवार यांचे आभार मानले व शिंदखेड़ा तालुका हा कायम अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त केला 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष नितिन सासके यांनी केले  तर कार्यक्रम यशस्वीते साठी सर्वच शिक्षक बांधव यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध