Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २९ जुलै, २०१९
गुरुकुल संगीत महाविद्यालय शिरपूर चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
शिरपूर:(प्रतिनिधी) निनाद फौंडेशन शिरपूर संचलित गुरूकुल संगीत महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ काल संध्याकाळी अग्रसेन भवन येथे
धुमधडाक्यात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेशचंद्र ओस्वाल हे होते. प्रमुख अतिथी खानदेशातील प्रसिद्ध लेखक,समिक्षक डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. नितीन निकम, तरुण गर्जना या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक संतोष भोई, यशवंत निकवाडे सौ यास्मिन नोमानी मँडम, संगीत महाविद्यालयाच्या संचालिका सौ. संगीता शास्त्री मँडम, कार्यक्रमाचे आयोजक व महाविद्यालयाचे संचालक डॉ. नितीन शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुकुल संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गीते व विविध वाद्यांचे वादन करून
कार्यक्रमात खरे चैतन निर्माण केले. सरस्वती वंदना, स्वागत गीत, नटराज वंदना, मधुबन में राधिका नाचे रे, लंबी जुदाई, अजिब दासता है ऐ, मोसे छल किया जाय, लागा चुनरी में दाग या गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. तसेच हार्मोनियम वादन, किबोर्ड वादन देखील श्रोत्यांच्या पसंती ला उतरले. नादब्रह्म अर्थात समूह तबला वादन हे
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. सन 2018 या शैक्षणिक वर्षात झालेल्या परिक्षांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त
विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आर्दश शिक्षक बी.एच. पवार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. एन.एस. डोंगरे यांनी केले आणि आभार जितेंद्र
जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक,परिसरातील रसिक श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरूकुलचे विद्यार्थी अंकित कुलकर्णी, सागर जैन, कृष्णा सोनावणे, सारंगी कुलकर्णी, पायल माळी,निनाद शास्त्री, मुकूंद जोशी, मैत्रेय डोंगरे, चामुंडा साऊंड सिस्टीम चे दिपक बडगुजर यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा