Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ जुलै, २०१९
निमडाळे येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द
तरुण -गर्जना
धुळे : प्रतिनिधी
जिल्ह्यात सद्य :स्थितीत ई-पॉज मशीन प्रणालीद्वारे स्वस्त-धान्य मालाचे वितरण करण्यात येत आहे .यात आजही अनेक रेशन दुकानांमध्ये अनियमितता व गैरकारभार उघडकीस येत आहे .जिल्ह्यात रेशन गैरकारभार मोठ्या प्रमाणात असून अधिकारी ,कर्मचारी गैरकारभारास आळा घालण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येतआहे.प्रशासकीय सेवा दीनदुबळ्यासांठी- गोरगरिबांसाठी आहे याचा विसर शासकीय कर्मचारी यांना पडला आहे.
निमडाळे ता.जि.धुळे येथील शरद दगाजीराव पाटील व ग्रामस्थांनी रेशन दुकानदार शोभा हरी जाधव ,अध्यक्षा जिजामाता महिला मंडळ , निमडाळे दुकान क्र.५८ यांच्या रेशन गैरकारभाराबाबत चौकशीची मागणी २३ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जानुसार करण्यात आली होती.
अधिकारी त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने त्यांनी अमळनेर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष व रेशन गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकानंदारांचे कर्दनकाळ पंकज पाटील यांची मदत घेतली .पंकज पाटील यांनी जळगांव जिल्ह्यातील बारा रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्याकामी पुढाकार घेतला होता.त्यानुसार पंकज पाटील यांनी स्वतः लेखी व तोंडी तक्रार जिल्हापुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी रेखावर साहेब यांच्या कडे केली होती व स्वतः जिल्हापुरवठा अधिकारी यांनी रेशन दुकानाची चौकशी करावी अशी मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर स्वतः जिल्हापुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी रेशन दुकानाची तपासणी केली त्यात त्यांना गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आलेत. रेशन दुकानदार ई-पॉज मशीनच्या पावत्या लाभार्थींना देत नव्हते,दुकानांत तक्रार वही नसणे ,युनिट रजिस्टर दुकानात उपलब्ध नव्हते,दुकानदार यांनी बेकायदेशीररीत्या लाभार्थींचे रेशन कार्ड स्वतः जवळ ठेवले होते,शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने रेशन धान्य वाटप केले जात होते ,अंत्योदय व प्राधान्य लाभार्थींना कमी प्रमाणात धान्य वाटप केले जात होते असे गंभीर स्वरूपाचे दोष आदळून आलेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकानाची १०० % अनामत जमा करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला .शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होवू नये म्हणून नजीकच्या दुकानाला रेशन दुकान जोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
“गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकानदारांच्या विरोधात माझी लढाई असून समाजातील दीनदुबळ्यासांठी- गोरगरिबांसाठी हा माझा लढा सुरूच राहणार आहे. त्यांच्या हक्काचे धान्य जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहचणार नाही तोपर्यंत प्रशासन व रेशन दुकानदार यांच्याशी माझा संघर्ष सुरूच राहील ”
(पंकज पाटील )
तालुका अध्यक्ष , प्रहार जनशक्ती पक्ष .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा