Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ जुलै, २०१९

अजनाड येथे उद्या तापी जन्मोसव सोहळा...

 
रावेर(प्रतिनिधी)अजीज शेख  तालुक्यातील अजनाड येथे उद्या दि ८ जुलै रोजी सुर्यकन्या तापीनदी जन्मोत्सव सोहळा सालाबादप्रमाणे फैजपुर येथिल  महामंडलेश्वर प पुं श्री जनार्दनहरीजी महाराज,सावदा येथिल स्वामी नारायण गुरुकुलचे प.पु श्री  भक्ती किशोरदासजी   महाराज,कुसुंबा येथील प.पु श्री

भरतदासजी महाराज  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे               रावेर तालुक्यातील अजनाड येथील प्रगतीशील शेतकरी विनायक शामु महाजन व त्यांचे जेष्ठ चिरंजीव विजय विनायक महाजन व प्रल्हाद शामु महाजन  यांच्या संकल्पनेतून  सुमारे 20 वर्षापासून अजनाड येथे सुर्यकन्या तापीमाईचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो

..सालाबादप्रमाणे यावर्षीही दि ८जुलै सोमवार रोजी  सकाळी १० वाजता फैजपुर येथील महामंडळेश्वर प.पु.श्री जनार्दन हरीजी महाराज ,सावदा येथिल स्वमीनारायण गुरुकचलचे प.पु श्री भक्ती किशोरदासजी महाराज प.पु श्री
भरतदासजी महाराज  यांच्या सह रावेर चे आ हरीभाऊ जावळे,जि प चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन माजी जि प शिक्षण

सभापती सुरेश भाऊ धनके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,सं गा यो चे रावेर तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील जिप सदस्या सौ रंजना पाटील, सौ नंदा पाटील, जि प ,सदस्य कैलास सरोदे, तथा सर्व पं स सदस्यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव
सोहळा पार पडणार आहे  तापी जन्मोत्सव सोहळ्यात परीसरातील  सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान तापी

जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजक विनायक शामू महाजन ,प्रल्हाद शामु महाजन व विजय विनायक महाजन यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध