Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ जुलै, २०१९
शिंगावे बोरगांव रस्त्याच्या कामावरून राडा,लक्ष्मी प्राप्त झाल्याची चर्चा
शिरपूर:प्रतिनिधी :आज शिंगावे बोरगांव रस्त्याच्या कामावरून राडा झाला.रस्त्याच्या कामाला विरोध करणार्यांनी कामाचे स्वागत केले मात्र काही विरोधकांनी हिंगोणीच्या पुढे निष्क्रिय काम होऊ देणार नाही असा ठाम निर्णय घेतला आहे.
शिरपूर तालुक्यातील शिंगावे ते बोरगांव रस्त्याच्या निष्क्रुष्ट कामावर अनेकदा येथील ग्रामस्थांनी विरोध केला होता.गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळत नव्हती.याबाबत अनेक आंदोलने व निवेदन प्रशासनाला देण्यात आली
होती.परिसरातील तरुणांनी आमचे अवयव घ्या आणी त्या पैशांनी रस्त्याच्या कामाला सुरवात करा असे निवेदन दिले होते.यानंतर २०१८ मध्ये प्रशासन खळबळून जागी झाली.आणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली. मात्र निष्क्रुष्ट काम होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी या बाबतीत विरोध दर्शवला होता.मुदत संपल्या नंतर देखील अद्याप रस्ता पुर्ण झाला नव्हता व रस्त्याचे काम देखील निष्क्रुष्ट पद्धतीने केले जात होते यामुळे परिसरातील नागरिकांनी काम बंध करून मुंबई व नाशिक येथील
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या विभागाला तक्रार करण्यात आली होती.या रस्त्याबाबत एकही बिल पास केले नसल्याचे संबधीत धुळेच्या अधिकारी यांनी सांगितले होते.मात्र मुंबई व नाशिकचे संबंधित अधिकारी रस्त्याची जो पर्यंत चौकशी करत नाही तोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरवात
करण्यात येणार नाही असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता मात्र काल परवा पासून विरोध करणार्यांमधील दोन ते तिन जणांनी रस्त्याच्या कामाला सुरवात केली आहे.कामाची चौकशी शिवाय सुरवात कशी झाली याबाबत सर्वत्र परिसरात चर्चा रंगु लागली आहे.ज्यांनी कामाला सुरवात केली त्या ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ गेले असता.तेथे राडा निर्माण झाला. हिंगोणी पर्यंत रस्ता करा मात्र हिंगोणीच्या पुढे कामाला विरोध कायम राहिल असल्याचे सांगण्यात आले.
यात रस्त्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांंमधील काही मंडळींना लक्ष्मी प्राप्त झाल्याची चर्चा रंगत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा