Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
शिर्डी येथे दि.१३ जुलै ला ठाकूर कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडाबाबत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व पीडित परिवाराला शासनाकडून मदत व संरक्षण मिळावे म्हणून अमळनेर ठाकूर समाज मंडळातर्फे आज प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
शिर्डी येथे दि.१३ जुलै ला ठाकूर कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडाबाबत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व पीडित परिवाराला शासनाकडून मदत व संरक्षण मिळावे म्हणून अमळनेर ठाकूर समाज मंडळातर्फे आज प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
अमळनेर :प्रतिनिधी (शिवाजी पारधी) शिर्डी येथे १३ जुलै ला आदिवासी ठाकूर परिवारातील नामदेव ठाकूर ,वृद्ध पत्नी व नात अश्या तिघांची निर्घृणपणे गळे चिरून हत्या करण्यात आली.परिवारातील राजेंद्र ठाकूर व एक मुलगी जखमी असून
दवाखान्यात दाखल आहेत.संपूर्ण परिवाराच संपविण्याचा घाट आरोपीने घातला होता म्हणून संबंधित आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी.सदर मृत हे आदिवासी ठाकूर जमातींचे असल्याने ऍट्रासिटी अक्ट अंतर्गत गुन्हे नोंद व्हावेत.अशी मागणी प्रांताधिकारी सिमा अहिरे यांचेकडे याप्रसंगी बोलतांना
राज्य सरचिटणीस रणजित शिंदे, अमळनेर अध्यक्ष दिलिप ठाकूर, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर,सरचिटणीस प्रकाश वाघ,उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी केली.याप्रसंगी दिलेल्या निवेदनात, पोलिसांकडून सदर गुन्ह्याचा तपास कसून सर्व अंगांनी व्हावा.मोलमजुरी करणाऱ्या ठाकूर पिडीत परिवाराला शासनाकडून आर्थिक मदत व पोलिस संरक्षण मिळावे.जखमींच्या दवाखान्याचा खर्चही शासनाने करावा.अश्या मागण्या अमळनेर आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळ तर्फे करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी नथथुबापू वानखेडे, दिलीप वानखेडे, अर्बन बँक संचालक शांताराम ठाकूर, पदाधिकारी अनिल जगन्नाथ ठाकूर, युवक अध्यक्ष गुणवंत वाघ,किरण ठाकूर,नारायण वानखेडे,अनिल सोमा ठाकूर, महिला अध्यक्षा मिनाबाई ठाकूर,अपेक्षा पवार,बेबीबाई वानखेडे, नारायण वानखेडे,देविदास ठाकूर, सुखदेव ठाकूर,साहेबराव पवार,विजय ठाकूर, गजाजन ठाकूर, काशिनाथ ठाकूर, यशवंत सुर्यवंशी, निलेश वाघ, बाळकृष्ण
ठाकूर,अरुण ठाकूर,प्रकाश ठाकूर,संजय सुर्यवंशी, राजेंद्र ठाकूर,रामदास ठाकूर, शालिक ठाकूर,हिंमत ठाकूर,लोटन ठाकूर,आदिंनी सदर घटनेचा याप्रसंगी जाहिर निषेध नोंदविला आहे. तसेच सदर गुन्ह्याबाबत आरोपीला कोणत्याही बाबीखाली कोणत्याही प्रकारची सूट
मिळता कामा नये.महाराष्ट्रातील ठाकूर जमातीच्या लोकांच्या भावना अत्यंत तिव्र स्वरूपाच्या असून समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे तरी शासनाने प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी असा इशाराही महाराष्ट्र आदिवासी ठाकूर समाज मंडळतर्फे देण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा