Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
नंदगाव शिवारात उभा राहणार राजमाता जिजाऊ सहकारी सुतगिरणी प्रकल्प,,,,मुख्यमंञी येणार भुमिपूजनाला..डॉ़.रविंद्र चौधरी यांनी पञकार परिषदेत केले जाहिर.
नंदगाव शिवारात उभा राहणार राजमाता जिजाऊ सहकारी सुतगिरणी प्रकल्प,,,,मुख्यमंञी येणार भुमिपूजनाला..डॉ़.रविंद्र चौधरी यांनी पञकार परिषदेत केले जाहिर.
अमळनेर प्रतिनिधी(संदीप सैदाणे) तालुक्यातील मौजे नंदगाव शिवारातील गट नंबर १३४ मध्ये २५ एकर क्षेञात
सुतगिरनिचा हा भव्य प्रकल्प उभारला जाणार.दिनांक23जुलै २०१९ रोजी सहकार पणन व वस्ञोद्योग विभागाने शासन निर्णय काढून ही मान्यता दिल्याचे सांगत भुमिपूजनानंतर अवघ्या तिन वर्ष्यात सुतगिरणी पुर्ण करून २०२२ पर्यंत
कुढल्याही परिस्थितीत ऊत्पादन काढून दाखवणार असे डॉ रविंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले.सुतगिरणीमध्ये कुशल व अकुशल मिळून १००० कामगारांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल.विप्रे कंपणी शिवाय
रोजगाराचा कुठलाही पर्याय अमळनेर तालुक्यातील तरूणाकडे नसून हजारो संसार या सुतगिरणीमुळे सक्षम होतील असा विश्वास आम्हाला आहे असे त्यांनी सांगितले.पञकार परिषदेला आमदार शिरीष चौधरी व मिञ परिवराचे सदस्य हजर होते.निवडणुकिच्या तोंडावर
सुतगिरणी भुमीपुजनाची घोषणा तर नाही ना ?या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की ""शेताला पाणी व हाताला काम'' या आश्वसनपुर्ती साठी आमचा प्रयत्न आहे तसेच बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी आमची धावपळ आहे
.विरोधकांमुळे या प्रकल्प पर्णत्वासाठी एक वर्षाचा विलंब झाला असे त्यांनी ठासून सांगितले.जुन्या व नव्या धोरणानुसार हा प्रकल्प २३ कोटींनी वाढला आहे असे डॉ रविंद्र चौधरी यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा