शिरपूर :प्रतिनिधी दि 1जुलै 2019 रोजी शिरपूर तालुक्यातील बाभुळदे येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील कृषिदूत यांनी कृषिदिन साजरा केला. यावेळी जि.प.शाळा बाभुळदे व ग्रा.पंचायत बाभुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदूतांनी कृषिदिन, कृषिदिंडी वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले.
या कार्यक्रमात सरपंच सौ. शारदा सरदार पाटील , उपसरपंच सौ. सुरेखा देविदास निकुंभे, ग्रामसेवक , पोलिस पाटील ग्रामस्थ तसेच शेतकरी बांधव यांचा सहभाग होता.
यावेळी कृषिदूतांकडून वृक्षारोपण, संवर्धन, संगोपण व कृषिदिनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यात महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना
देण्यात आली. यामध्ये कृषिदूत ज्ञानेश्वर खैरनार, मयूर पवार , सागर मुटेकर , केशव खैरे, काळे स्वप्निल , चैतन्यकुमार कराळे , जे.लोकेश, बी. एसवंत रेड्डी यांचा समावेश होता. त्यांना जि.प.शाळा बाभुळदे मुख्याध्यापक श्री.भरत पवार व उपशिक्षक श्री राकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले
धन्यवाद सरजी
उत्तर द्याहटवा