Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ जुलै, २०१९
आरंभ सामाजिक संस्था स्वीकारणार होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व
प्रतिनिधी( विशाल डुकरे) गुणवत्ता ही जशी श्रीमंतांमध्ये असते, तशीच ती गरिबांमध्येही ठासून भरलेली असते. दुर्दैव एवढेच की, अनेक गरिबांच्या गुणवत्तेला योग्य संधी न मिळाल्याने ती जगासमोर येतच नाही. मात्र विद्यार्थ्यांना समाजाची साथ मिळाली, तर त्यांचे आयुष्य उजळून निघते. अशीच आयुष्य उजळून टाकणारी संधी आता ‘आरंभ संस्था’ १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना देणार आहे.
आपण समाजाच काही देणं लागतो ही भावना जोपासत नळदुर्ग शहरातील संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार,सहसचिव अभय हजारे, कोषाध्यक्ष सागर हजारे,प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, सोशल मिडियाप्रमुख सुरज आवटे,हरिदास बेले,रोहित डुकरे,सचिन पवार,मयूर महाबोले,राम जाधव,कैलास घाटे या तरुणांनी एकत्र येऊन आरंभ सामाजिक संस्थेची स्थापना केली
आपल्या शहरातील खालावत चाललेला शिक्षणाचा दर्जा हा प्रमुख विषय आपल्या समोर आल्याने. आपला पहिला उपक्रम शैक्षणिक क्षेत्रातील असावा असे ठरविले, या उपक्रमातून केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पाढाओ या मोहिमेत सहभाग नोंदवला जाणार आहे. नळदुर्ग शहरांत शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच पैशाअभावी कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी *नळदुर्ग शहरातील ११ विद्यार्थी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने घेण्यात आला आहे.
शहरातील हुतात्मा बाबुराव बोरगावकर प्रशाला कारखाना, अंजनी प्रशाला, नॅशनल शाळा, जि.प. प्रशाला मराठी व उर्दू माऊली नगर, जिप कन्या प्रशाला या शाळांना भेट देऊन शिक्षणाची आवड असणाऱ्या, अनाथ विद्यार्थी किंवा आर्थिक दुर्बलता अशा निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली. अनुक्रमे अभिजित किरणसिंह दीक्षित (ई.१०वी), सुमन भाऊ राठोड (ई.१०वी), मनीषा मल्हारी कोकणे (ई 6 वी), प्रियंका बालाजी ठाकूर (ई.१०वी), दिपाली दिलीप शिंदे (ई.१०वी), रतनबी लाडलेसाहब शेख (ई.१०वी), अरमान बालाजी शिंदे (ई.१०वी), उजमा जिंदावली शेख (ई.१०वी), भाग्यश्री विलास चौरे (ई.१०वी), पायल जितेंद्र लोंढे (ई.१०वी) व *बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग
येथील १२ वीची असे एकूण ११ विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून दत्तक घेण्यात येणार असून या सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च ज्यामध्ये वही, पुस्तके, गणवेश, पेन, कंपास, आलेख वही व प्रथम सत्र व बोर्डाच्या परीक्षेची फीस सहीत संपूर्ण शिक्षणाचा खर्च संस्था उचलणार असून ३० जुलै रोजी या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
-
बापू चव्हाण दिंडोरी क्रिशा फाऊंडेशन संचलित ज्ञानज्योती क्लासेस,किड्स टाऊन स्कूल आणि क्रिशा टेक्नो हबचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा