Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ जुलै, २०१९
कृषिदुतांनी साधला जेष्ठ नागरिकांसोबत संवाद
प्रतिनिधी :(निखिल राजपूत)नारायणगाव, ता. जुन्नर दि16जुलै2019
गुंजाळवाडी परीसरात कृषी महविद्यालय,पुणे येथील कृषिदूतांनी गुरु पौर्णिमेच्या औचित्य साधून गुंजाळवाडी परिसरातील शेतकरी तसेच जेष्ठ नागरिकांसोबत पारंपारिक शेती तसेच पारंपारीक लोकजीवन , सेंद्रिय शेती
,आधुनिक शेती पद्धती त्याचे परिणाम ,तसेंच गावातील विविध समस्यावर चर्चा केली, यावेळी कृषिदूतांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहीती दिली, तसेच यावेळी जेष्ठ नागरिक प्रश्न मंजूषा घेण्यात आली , नागरिकांनीही उत्स्फुर्त सहभाग नोंदवला यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. एम.एन.वाघमारे सर , कृषी
महविद्यालय,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली कृषिदूत सौरव पाटील, शुभम पोफळे, निखिल राजपूत, राजेश राऊत, बद्रीनाथ साबळे, महेश शिंदे (कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले व विषयानुसार मार्गदर्शन केले, तसेच यावेळीं शेतकरीं , तसेंच महीला, जेष्ठ नागरिक यांचा उत्स्फूत सहभाग होता . कार्यक्रमाचा शेवट
पसायदान व आभारप्रदर्शनाने केला यापुढेही कृषिदुत गूंजाळवाडी गावात विविध उपक्रम राबवणार आहेत, यांत ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा