नारायणगाव ता. जुन्नर प्रतिनिधी (निखिल) (राजपूत )दि.10 जुलै 2019 :- गुंजाळवाडी परीसरात कृषी महविद्यालय ,पुणे येथील कृषिदूतांनी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले , तसेच महिला सक्षमीकरण विषयी मार्गदर्शन केले , ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम चे अधिकारी डॉ. एम.एन.वाघमारे सर , कृषी महविद्यालय, पुणे 05 यांचे मार्गदर्शनाखाली कृषिदूत सौरव पाटील,शुभम
पोफळे,निखिल राजपूत,राजेश राऊत,बद्रीनाथ साबळे,महेश शिंदे (कृषि महाविद्यालय , पुणे 05) यांनी प्रशिक्षण दिले , यावेळीं शेतकरी , तसेंच महीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला ,
तसेच कृषीदूत यापुढे बीजप्रक्रिया ,माती आरोग्य , शेतीमाल प्रतवारी , शेतीची माहीती , याविषयी माहिती पुरवणार आहेत , व या कार्यात गुंजाळवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा