Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १० जुलै, २०१९

निंभोरा येथे शेतमजुराचा पाय घसरून विहीरीत पडून मृत्यू.



रावेर :प्रतिनिधी(अजीज शेख) तालुक्यातील निंभोरा

येथे रहिवाशी पंकज धनराज भंगाळे (वय ३३) या तरूण शेत मजुराचा विहीरीत  प्यायचे पाणी घेत असतांना पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि.०९ रोजीदुपारी घडली. 

सविस्तर वृत्त असे की, पंकज भंगाळे हा नेहमी प्रमाणे शेतात कामाला गेला होता. पाणी पिण्यासाठी विहीरीजवळ पंकज गेला असता त्याचा तोल जावून पाय विहीरीत पडल्याने गट नं.१२६७ मधील अनिल कोळंबे यांच्या विहरीत पडून पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घरातील कमवता व्यक्ती

 गेल्याने मोठे संकट पंकजच्या कुटूंबावर कोसळले आहे. पंकजच्या पश्चात आई,वडील, पत्नी व दोन लहान मुले असा संसार मागे आहे. रावेर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत निंभोरा पोलिसात मनोहर चावदस भंगाळे यांच्या फिर्यादीवरून सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ए.पी.आय प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार अनवर तडवी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध