Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
घरपट्टी वाढीच्या विरोधात जनतेच्या सहकार्याने धडक मोर्चाचे दि 23 तारखेला नियोजन -- डॉ. चंद्रकांत बारेला
घरपट्टी वाढीच्या विरोधात जनतेच्या सहकार्याने धडक मोर्चाचे दि 23 तारखेला नियोजन -- डॉ. चंद्रकांत बारेला
चोपडा ( प्रतिनिधी )विनोद निकम चोपडा नगरपालिकेने घरपट्टी वाढवुन जनतेला कोणते गिप्ट दिले आहे ? कोणत्या सुविधा पुरविल्या आहेत ? याबाबत नगरपालिकेने उत्तर दयावे. व या विरोधात धडक मोर्चा चे नियोजन दि 23 रोजी डॉ चंद्रकांत बारेला यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे या धडक मोर्च्यांत सामान्य जनतेनेसह विविध संघटना, सामाजिक संस्था, यांनी आमच्या सोबत यावे असे आवाहन डॉ चंद्रकांत बारेला कडून पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे .
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते म्हणाले की चोपडा नगर पालिकेने २५% घरपट्टी वाढवून सर्व सामान्य जनतेला कोणते गिफ्ट दिले आहे?कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत?असा सवाल केला आहे.या करिता डॉ.बारेला यांनी २३ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्च्यांत सामान्य जनता , सामाजिक संघटना,
कॉलनी परिसरातील जनता, मित्र परिवार, महिला, डॉक्टर असोसिएशन, आणि इतर लोकही मोर्च्यांत सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावे असे आवाहन डॉ चंद्रकांत बारेला यांनी केले आहे हा मोर्चा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या मैदानापासून स्वस्तिक टॉकीज,चिंच चौक ,गुजराथी गल्ली,रथ गल्ली,मेन रोड मार्गे ते नगरपालिका येथे येऊन मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून याबाबत जाब सुद्धा विचारले जाणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत अमोल राजपूत, ईश्वर सुर्यवंशी, सचिन पायील,दीपक वानखेडे हे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

Bro apna hak milkar rahega
उत्तर द्याहटवा