Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९
*शहरात मोकाट जनावरांचा हैदोस* वाहतुकीला अडथळा, प्रशासनाचे दुर्लक्ष
चोपडा:-(प्रतिनिधी)विनोद निकम शहरात मोकाट जनावरांचा हैदोस वाढल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली असून अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत. नगरपालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस जनावरांचा बंदोबस्त करण्यास कमी पडल्याने चोपडा शहर वासीयांच्या समस्या आखणीच वाढल्या आहेत...येथे शहरातील रस्त्यांवर मात्र जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे अनेकदा अपघातसुद्धा झालेले
आहेत.मोकाट जनावरांमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा, ही बाब चोपडा वासीयांच्या डोकेदुखीत भर घालणारी ठरली आहे.ऐन चौकात रस्त्याच्या मध्यभागी किंवा वर्दळीच्या ठिकाणी त्यांचा ठिय्या असतो. सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या वेळी वाहतूक खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेषत: शहराच्या
सीमावर्ती भागात मोकाट जनावरांचा त्रास अधिक आहे. त्याविषयी विशेष चर्चा होत देखील नाही.पावसाळ्यात गाईच्या गोठय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी असल्यामुळे अनेक गोपालक त्यांना सकाळच्या वेळी मोकळे सोडून देत असल्याचे प्रकार बघायला मिळतात. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांकडून दंड वसूल करण्यात यावा असे शहरवासीयांच्या माफक अपेक्षा आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा