Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील अमळथे तापी नदी पत्रावरील त्याने सुरू केलेला वाळूचा ठेका तात्काळ रद्द करावा
शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील अमळथे तापी नदी पत्रावरील त्याने सुरू केलेला वाळूचा ठेका तात्काळ रद्द करावा
शिंदखेडा:प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील अमळथे तापी नदी पत्रावरील त्याने सुरू केलेला वाळूचा ठेका तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी तापी काठावरील वर पाडे नेवाळे अमळथे सोनेवाडी अक्कडसे या गावातील
ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे दरम्यान या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे माजी आमदार रामकृष्ण पाटील आदींनी भेटी दिल्या आहेत
अमळथे वरपाडे सोनेवाडी नेवाळे अक्कडसे या गावातील या आंदोलनाला उग्र रुप येणार असून प्रशासनाने या मागणीकडे लक्ष घालावे अन्यथा मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करू असा इशारा विविध गावांचे सरपंच यासह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी दिला आहे दरम्यान आज सकाळी दहा वाजेपासून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात या
आंदोलनाला सुरुवात झाली आहे सदरचे आंदोलन बेमुदत असून तहसीलदारांना दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे हा वाळु घाट रद्द करण्याची मागणी केली आहे वरिष्ठांपर्यंत या मागणीचे निवेदन देखील पाठवण्यात आले आहेत परंतु अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही म्हणून या ग्रामस्थांना आंदोलनाचे अश्र उभारावे लागले आहे शिंदखेडा तहसीलदार सुदाम महाजन यांची 15 ऑगस्ट रोजी या ग्रामस्थांनी देखील प्रत्यक्षात भेट घेतली होती या भेटीत प्रांताधिकारी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे का कुठल्याही प्रकारे रद्द होणार नाही अशा प्रकारची तंबी या ग्रामस्थांना देण्यात आली होती परंतु शासनाच्या
आडमुठे धोरणामुळे हा ठेका सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी देण्यात आला आहे अमळथे बाळू घाटाच्या निर्णय लिलाव यापूर्वी दोन वेळा दिला गेला असताना संबंधितांनी वाळूचा ठेका वारेमाप करून तापी माईची लूट केली आहे त्यामुळे या भागातील गावांना पाणीटंचाईची झळ सोसावे लागले आहे अनेक वेळा वाळू घाटाचे लिलाव देऊ नये अशी मागणी करूनही ग्रामसभेचा ठराव करून प्रशासनाने दिशाभूल केली आहे त्यामुळे त्यामुळे वाळू लिलाव प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या 1 मे रोजी च्या
ग्रामसभेमध्ये वाळू ठराव देण्यात येऊ नये झालेला असताना 15 ऑगस्ट 18 मध्ये वाळू विषयी कुठलाही उल्लेख नसताना बेकायदेशीररित्या वाळू ठराव असल्याचे बनावट ठराव करून ग्रामस्थांची दिशाभूल झाली आहे जिल्हाधिकारी साहेबांना यासंदर्भात ग्रामस्थ भेटले देखील आहेत परंतु पुन्हा तहसीलदार यांनी हा ठराव करून घेऊन मोठे गड मंगल केले आहे त्यामुळे अपर जिल्हाधिकार्यांनी 26 जुलै 19 च्या काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे बेमुदत उपोषणात तापी काठावरील सरपंचमध्ये नेवाळे सरपंच लक्ष्मीकांत साळुंके
उपसरपंच शालीक भिल सोनेवाडी सरपंच संजय कुवर उपसरपंच नारायण सोनवणे अक्कड चे सरपंच रावसाहेब कोळी वर पाडे सरपंच रमेश आहिरे उपसरपंच मनोहर पवार यांच्यासह या आंदोलनाचे प्रमुख एडवोकेट वसंत लोटन पाटील अमर ते उपसरपंच पंडीत भिमराव पवार हरेश मनोहर पवार रामराव पवार नरेंद्र राम सिंग गिरासे राकेश सोनवणे विलास बोरसे शामराव बदाने छगन धनगर आधी सुमारे 500 च्यावर ग्रामस्थ आंदोलनात बसले आहेत
,,,,,,,, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारू हेमंत साळुंके यांचा इशारा
वाळू ठेकेदारांनी याआधीच लूट केली असताना पुन्हा वाळूचा ठेका अमळथे गावाजवळच देण्याच्या प्रशासनाचा हा अट्टाहास कशासाठी प्रशासनाला शिंदखेडा तालुक्यातीलच वाळू चालते का असा संतप्त सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी विचारला आहे तापी
काठावरील वाळू आंदोलन सुरू असलेल्या तहसील कार्यालयासमोर असे सांगून बेमुदत उपोषणा ला त्यांनी भेट दिली सदरच्या प्रश्न जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्याकडे मांडू अशी माहिती त्यांनी यावेळी दिली वय या आंदोलनाला पुर्ण पणे शिवसेना शिवसेना पाठीशी उभी राहील असे सांगून शिवसेना स्टाईलने यापुढे उत्तर देण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी दिला आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा