Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

शिरपूर शहरातील प्लास्टिक कचर्यावर अमलबजावणी करणे गरजेचे.. नगरपरीषदेच्या दुर्लक्षपणामुळे जनावरांंचा जिव धोक्यात,




प्रतिनिधी :शिरपूर तालुक्यातील गोभक्तआणि शिरपूर नगरपरिषदेला विनम्र आवाहन 
प्लॅस्टिकच्या कॅरीबगवर बंदी असतांना देखील गुटख्याप्रमाणे सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे.  टाकाऊ प्लास्टिक हे मानवांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याला घातक ठरत आहे. शिरपूर नगरपालिकेच्या घंटा  गाड्यांमधून दिवसभर शहरातून जो कचरा जमा होतो तो सर्व कचरा शनी मंदिराजवळ असलेल्या डंपिंग ग्राउंडवर अस्तव्यस्तपणे रस्त्यावरच फेकला जातो.

 घंटा गाडी कचरा घेऊन येताच सर्व  मोकाट सोडलेले जनावरे या ढिगाऱ्यांवर आकृष्ट होतात. चाऱ्याप्रमाणेच हे प्लॅस्टिक खात असल्याने कित्येक जनावरांचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणे आहेत.
या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी त्वरित काही उपाय योजना अमलात आणल्या पाहिजेत. तालुक्यातील गो भक्तांनी आणि शिरपूर नगरपरिषदेने या मोकाट गायींच्या मालकांना योग्य समज देऊन आपापल्या जनावरांना गोठ्यात बांधायच्या सूचना दिल्या पाहिजेत. अथवा नपा प्रशासनाने या जनावरांना कोंडवाड्यात आणून त्यांच्या मालकांवर कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे.

या प्लास्टिकमुळे माणसांची सोय होत असली तरी जनावरांसाठी ते हानिकारक ठरत आहे. लग्नकार्यात प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण, वाटी, चमचे आदींचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. 
लग्नमंडपात सार्वजनिक सभागृहात, तथा मंगल-कार्यालयात लग्नकार्य पार पडले की, लोकं निघून जातात. उरलेले अन्न व प्लास्टिक पत्रावळींच्या ढिगाकडे जनावरे तुटून पडतात. हेच प्लॅस्टिक खावून निष्पाप जनावरांचा मृत्यु होतो. 
 याकडे शिरपूर प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
   
प्लॅस्टिक खाण्यामुळे जनावरांवर होणारे परिणाम :- 

   
जनावर चारा खात नाही व त्यांचे पाणी पिणे कमी होते.

दुग्धोत्पादनामध्ये घट येते. जठराची हालचाल कमी होते.
शेणाचे प्रमाण कमी होते. वारंवार पोटफुगी होते.

रक्ताची तपासणी केली असता रक्तावर कुठलाच परिणाम दिसून येत नाही. शारीरिक तापमान, हृदयाची गती व श्‍वासाच्या गतीवर काहीच फरक पडत नाही.

अशा जनावरांवर शस्त्रक्रिया करून खाल्लेले प्लॅस्टिक जनावराच्या कोठीपोटातून बाहेर काढणे हाच यावर एकमेव उपचार आहे.

तसेच, जनावरांच्या सभोवतालचा परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवावा. प्लॅस्टिकचा वापर नियंत्रित करावा व नंतर त्याची विल्हेवाट योग्यरीत्या होईल याची काळजी घ्यावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध