Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

मलकापुरात भारतीय जन सम्राट पार्टी चा महिला मेळावा संपन्न






मलकापूर (प्रतिनिधी) मलकापुर तालुक्यातील महिलांच्या समस्या 25 वर्षात आमदार सोडवु शकले नाहीत ही शरमेची बाब - राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने
महिलांच्या समस्यांचे निवारण करण्या करीता भारतीय जन सम्राट पार्टी आंदोलन करणार-  सौ.उषा मानकर

मलकापुर (ता.प्र) भारतीय जन सम्राट पार्टी च्या वतीने   दि 4 ऑगष्ट 19 रोजी कृषी उत्पन्न बाजार समीती सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या वेळी अध्यक्ष पदावरुन बोलतांना भाऊसाहेब बावने म्हणाले की महिला मेळाव्यात मलकापुर तालुक्यातील या मुलभुत समस्या रस्ते ,विज,पाणी गावात विद्यार्थ्यांना बसेस नाहीत शौचालय ह्या सारख्या समस्या महिलांनी मांडल्या ते पाहता येथील सत्ताधारी आामदार हे गेल्या 25 वर्षापासुन आमदार असुनही ते ह्या 

समस्या सोडवु शकले नाही ही शरमेची बाब असुन महिलांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडण्या करीता आमचा पक्ष जन आंदोलन करणार असल्याचे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने होते तर कार्यक्रमाचे उदघाटक महिला मोर्चा 

बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सौ.उषाताई मानकर हे होत्या सर्व प्रथम मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेला सौ.मानकर यांनी हार अर्पण करुन महिला मेळाव्याचे उदघाटन केले.या  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय टप  युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नारायण पानसरे,  भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ओंकार कुसुंबे महिला मोर्चा जिल्हा सचिव 

सौ.आशा पारस्कर महिला मोर्चा शहर अध्यक्ष रेखा शर्मा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रवि अग्रवाल युवा मोर्चा शहर अध्यक्ष पप्पु राजपुत जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रसाद चव्हाण हे हजर होते आपल्या उदघाटनपर भाषणात सौ.मानकर म्हणाल्या की भारतीय जन सम्राट पार्टी खर्‍या अर्थाने महिलाांच्या समस्या सोडविण्या करीता 

कटीबध्द असुन प्रत्येक महिलांनी या पक्षाचे सभासदत्व स्विकारल्यास महिलांच्या प्रत्येक समस्ये करीता पक्ष जन आंदोलन करुन तुमच्या सर्व समस्या सोडविण्या करीता प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी हिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ.रेखा शर्मा,नागपुर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.नम्रता मुन,सौ.आशा 

पारस्कर,नारायण पानसरे यांनीही आपले मत व्यक्त केले.मलकापुर तालुक्यातील अनेक महिलांनी आप आपल्या गावातील रस्ते,शाळेतील मुलांना गावात बस येत नाही गावातील अनेक रस्त्यात गड्डे पडलेले असुन गावात शौचालय नसल्यामुळे महिलांना 

उघड्यावर बसावे लागते बँका कर्ज देत नाहीत अश्या अनेक समस्या कडे स्थानिक आमदार दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी या वेळी महिलांनी मेळाव्यात उपस्थित केल्यात या वेळी अनेक महिलांनी भारतीय जन सम्राट पार्टी चे सदस्यता फॉर्म भरुन सदस्यता स्विकारली त्यांना प्रत्येकाला पक्षाच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पक्षाचे सरचिटणीस  श्रीकृष्ण भगत यांनी केले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध