Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९
भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद
प्रतिनिधी (विशाल डुकरे)नळदुर्ग शहर भाजप व युवा मोर्चा वतीने अभियानाअंतर्गत स्टॉलचे आयोजन भवानी चौक येथे करण्यात आले होते. जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीचे संघटनपर्व - २०१९ च्या अंतर्गत भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान 6 जूलै पासून सुरु आहे, यावेळी बोलताना
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील NDA च सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वात भारत देशाला उंचीवर घेऊन जात आहेत, तसेच देशात अनेक विकासकामे करीत असून राबवित असलेल्या योजनांमुळे जनता समाधानी आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाकडे नागरिक आकर्षित होत असल्याने सदस्य अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अनिल काळे, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, विस्तारक शिवाजीराव गिड्डे, विजय शिंगाडे, नागेश नाईक, गोकुळ शिंदे, नारायण नन्नवरे, संतोष बोबडे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस राहुल काकडे, विशाल रोचकरी, बालाजी कोरे, इंद्रजीत देवकते, सचिन घोडके तसेच जिल्हा व तालुका
पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य होण्याचा मान मिळविण्यासाठी शहरातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने अभियानाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशांत भूमकर, व्यापारी आघाडीचे धिमाजी घुगे, तालुका
प्रसिद्धीप्रमुख सुधीर पोतदार, भाजप शहराध्यक्ष पद्माकर घोडके, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, गोपाळ देशपांडे, दत्तात्रय दासकर, शफी शेख, सुनील बनसोडे, सागर हजारे, भीमाशंकर बताले, बबन चौधरी, गौस शेख व शहर पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा