Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
मा.आमदार जगदीशभाऊ वळवी यांची अजंतीसीम, मोहिदा,दगडी गावांना भेटी अजंतीसीम शाळेत दप्तर वाटप
मा.आमदार जगदीशभाऊ वळवी यांची अजंतीसीम, मोहिदा,दगडी गावांना भेटी अजंतीसीम शाळेत दप्तर वाटप
चोपडा:चोपडा प्रतिनिधी विनोद निकम तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार जगदीशभाऊ वळवी यांनी आज दिनांक 29 रोजी तालुक्यातील अजंतीसीम मोहिदा,दगडी या गावांना भेटी देत गाव वासियांच्या समस्या जाणून घेत त्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी अजंतीसीम गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांना शाळेसाठी दप्तर पाहिजे असा आग्रह गावातील सामाजिक कार्यकर्ते सोपान पाटील यांनी जगदीशभाऊ वळवी यांच्या कड़े धरला होता त्या अनुषंगाने माजी आ.जगदीशभाऊ वळवी यांच्या सौजन्याने इयत्ता 1ली ते 4थी या वर्गातिल सर्व चिमुकल्या मुलांना जगदीशभाऊ आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी छोटेखानी पण स्तुत्य अश्या कार्यक्रमात गावकर्यांच्या आग्रहाखातर केलेल्या आपल्या मनोगतात जगदीशभाऊ म्हणाले की;आपण सारे विद्यार्थी अजुन प्राथमिक शिक्षण घेता आहात हा खऱ्या अर्थाने तुमचा शिक्षणाचा पाया आहे पाया मजबूत असला पाहिजे म्हणून मन लावून शिका माझे वडील आदरणीय रमेश पान्या वळवी हे त्यांच्या काळात डोक्यावर लोखंडी पेटी घेवून 25 किलो मीटर पायी प्रवास करुन शाळेत जायचे त्याकाळी त्यांनी 7 वी फायनल पास केली पण ते थांबले नाही त्यांनी पुढे बी ए नंतर एल एल बी करीत आदिवासी समाजातील पाहिले वकील होण्याचा मान मिळवला.ते शिकले म्हणून आज मी व माझा परिवार सुस्थितित आहे,आजची शिक्षण पद्धती खुप चांगली व आपल्याला साऱ्या सोयी-सुविधा आहेत त्यामुळे आपण सर्वांनी उच्च शिक्षण घ्यावे भविष्यात स्वप्न बघायचे असतील तर आय एस, आय पी एस अधिकारी होण्याचे स्वप्न बघा असे आवाहन केले.यावेळी चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रा भरत पाटील, वराड येथील माजी सरपंच सुनील महाजन,विजय जगन्नाथ कोळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण रूपचंद कोळी,विजय जगन्नाथ पाटील, संतोष वामन पाटील, अरुण झावरु पाटील, भरत शांताराम पाटील, प्रवीण वामन पाटील, बालू विश्वनाथ पाटील, सुरेश पुंडलिक पाटील, कमलाकर चैतराम पाटील, रूपचंद भीका कोळी,निम्बादास भागवत शिक्षकअमृत पाटील,आदी ग्रामस्थ हजर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक प्रवीण माळी यांनी तर सूत्रसंचलन सोपान पाटील यांनी केले गावकर्यांनी व शालेय व्यवस्थापन समितीने दप्तर दिल्यामुळे माजी आमदार जगदीशभाऊ वळवी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करुन आभार व्यक्त केले.मोहिदा गाव भेटी प्रसंगी गावातील दत्त मंदिरात बैठक आयोजित करुन गाव तुमच्या पाठीशी राहील असे आश्वासन देण्यात आले यावेळी पंढरीनाथ पाटील, रमेश गोकुळ पाटील, यशवंत रामा पाटील, निम्बा झावरु पाटील, अशोक धनसिंग पाटील, नंदराम शामराव पाटील, दत्तू अमृत पाटील, सुनील झावरु पाटील, मंगल पंढरीनाथ पाटील, सीताराम सखाराम पाटील, शांताराम देवराम पाटील, दगा हिरामन पाटील, गजानन पर्वत पाटील, बळीराम सखाराम पाटील, सुरेश रामसिंग पाटील, अरुण बाबूराव पाटील, सोपान बाबूराव पाटील, पंढरीनाथ सुरसिंग पाटील बाळासाहेब धनसिंग पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते; दगडी गावाच्या भेटीत दगडी येथील गावकर्यांनी देखील जगदीश भाऊ यांना पसंती दाखवत मनापासून सहकार्य करु असे गावातील दत्त मंदिरात सांगितले यावेळी मूलचंद नारसिंग पाटील, भगवान उत्तम पाटील, खुशाल भगवान पाटील, विजय संतोष पाटील, पुंडलिक गटलु पाटील, चंद्रभान नामदेव पाटील, दत्तू महारू पाटील, संतोष सीताराम पाटील, सोपान वामन पाटील, समाधान पांडुरंग कुंभार यांच्यासह चोपडा येथील नाना देसले पत्रकार शाम जाधव हजर होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा