Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९
दहिवद येथे बेकायदा रस्ता रोको आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा दाखल .
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील दहीवद येथील रेशन दुकानदाराची तपासणी करण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे जात असताना दहीवद फाट्याजवळ रास्तारोको करून शासकीय कामात अडथळा करणाऱ्या जयश्री साळुंके आणि दीपक गिरधर पाटील यांच्यासह ५० ते ६० महिला पुरूषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २८ रोजी दहीवद येथून अनोळखी व्यक्तीने फोन
करून रेशन दुकानदार धान्य देत नसल्याची तक्रारी केली. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांचा संप असल्याने दहीवद येथील रेशन दुकानाची तपासणी
करण्यसाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे दहीवदचे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, हेडावेचे तलाठी हर्षवर्धन मराठे, अमळनेर तलाठी
पुरूषोत्तम पाटील, अमळगावचे तलाठी धिरज शिवाजीराव देशमख, दोधवदचे तलाठी वाल्मीक सिताराम पाटील, दहीवदचे तलाठी सुनिल गणेशराव पंचभाई .तलाठी दहीवद, कोतवाल प्रदीप दत्तात्रय देसले. आणि चालक दिलीप देविदास पाटील शासकीय वाहानाने ( एम.एच- १९ सिव्ही ०४०८) सायंकाळी चोपडा रोडने
जात होतो. दहीवद फाटा येथे पोहोचलो असताना या ठिकाणी अनेक गाड्या त्यात बसेस व इतर वाहणे रस्त्यावर उभे असलेले दिसली.
त्यातील प्रवासी व चालक यानी जवळ येऊन सांगितले की, पुढे रस्ता रोको केलेला असून वाहणे पुढे जाउ देत नाहीत. त्यामुळे मी रस्ताच्या उजवे बाजने आमचे शासकिय वाहण पुढे घेण्यास सांगितले. त्याच बरोबर सायरन वापरण्यास चालकाल सूचना दिल्या. असे असतानाही दहीवद फाटा येथे जयश्री साळुंखे (दाभाडे) रा. अमळनेर आणि दिपक गिरीधर पाटील रा. दहीवद ता. अमळनेर यांच्यासह ५० ते ६० महिला व पुरुषांनीरस्ता अडवून त्यातील काहीनी रस्ताचे मधोमध बसून रहदारी अडवून ठेवलेली दिसली. त्या नंतर शासकिय वाहणातील ध्वनिक्षेपकादृवारे रस्ता रोको करणाऱ्यांना सूचना दिल्या कि, रस्ता रोको बेकायदेशीर असून तुम्ही कोणत्याही प्रकारे परवाणगी घेतलेली नाही. तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मात्र या सूचनांकडे रस्ता रोको करणारे महिला व पुरुषानी दुर्लक्ष करुन रस्ता रोको कायम ठेवून जोरजोरात घोषणाबाजी केली. त्याना शांतता राखण्याचे आवाहण. त्यानां दहीवद येथे रेशन दुकाणांची तपासणी करण्यासाठी जावयायचे आहे, असे सांगूनही त्यांनी शासकीय वाहण अडवून मला पुढे जाण्यास मज्जाव केला व मी करीत असलेले शासकिय कामकाजात अडथळा आणला. तर जयश्री साळुखें (दाभाडे) आणि दिपक गिरीधर पाटील यांनी जमलेल्या अन्य व्यक्तीनां चिथावणी देवून माझी गाडी अडविण्यास प्रोत्साहण दिले व पुढे जाण्यास मज्जाव करुन मी करीत असलेले शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला. वाहणाच्या खाली उतरुन त्यानां समजावित असताना त्यांनी प्रशासन हमसे डरती है, पोलिस को आगे करती है, कोण म्हणते देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, पदाची गुर्मी आहे, तहसिलदार मॅडम मुर्दाबाद, आदी जोरजोरात घोषणा देण्यास सुरवात केली.
पोलिसांना केले पाचारण
याबाबत अमळनेर पोलिसांनी मोबाईलद्वारे माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रास्तारोको करणाऱ्यांना हटवले. त्यानंतर पुढे दहीवद गावात जाऊन नागरिकाच्या रेशनबाबतच्या समस्या जाणून घेतल्या तेथेही पुन्हा जयश्री दाभाडे आणि दीपक पाटील यांनी उर्मटपणे बोलून शासकीय कामात आडथळा आणल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. याप्रकरणी जयश्री साळुंके आणि दीपक गिरधर पाटील यांच्यासह ५० ते ६० महिला पुरूषांविरुद्ध भादंवि प्रमाणे ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा