Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

बी फार्मसी व एमबीए ची प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ फार्मसी स्टुडंट कौन्सिल संघटनेच्या प्रयत्नांना यश - भूषण भदाणे








कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
बी फार्मसी व एमबीए ची प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मिळावी यासाठी डॉ. अभय वाघ (संचालक तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई) यांना फार्मसी स्टुडंट कौन्सिल महा. राज्य या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळेस संचालकांकडून कळाले की, शासनाने DTE कडून पदविका (Diploma) सोडून सगळे अधिकार काढून घेतले आहेत. तर हे सगळे अधिकार राज्य सामायिक परीक्षा आयुक्त ( cetcell ) यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. तदनंतर फार्मसी स्टुडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्य सामायिक परीक्षां महा. राज्य ( cetcell ) च्या आयुक्तांना भेटून विद्यार्थ्यांच्या समस्या आयुक्तांसमोर मांडल्या व फा. स्टु. कौ. महा. राज्य तर्फे अध्यक्ष - भुषण संजय भदाने, सचिव - 

प्रत्त्युंम पाटिल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. आयुक्तांनी प्रस्तुत निवेदनाची ताबडतोब दखल घेत, प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मिळणे बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असल्याचे सांगितले व तात्काळ त्याअनुषंगाने पाठपुरावा करत मा. सुप्रीम कोर्टाकडून मिळालेल्या उत्तरांव्ये प्रवेश प्रक्रियेची तारीख ही वाढवण्यात आली असून ही तारीख 31 पर्यंत याची मुदतवाढ आहे, तरी सर्व विद्यार्थ्यानी याची नोंद घ्यावी. या प्रक्रियेसाठी स्टुडेंट कौन्सिल ने घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले आहे. 
फार्मसी स्टुडेंट कौन्सिल यांनी आयुक्तांचे व मा. सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या विद्यार्थी हिताच्या निर्णयाचे स्वागत करीत विशेष आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध