Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
दलित,शोषित वंचित समाजाचा जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त प्रांत अभिजित थोरबोले यांनी केले.
दलित,शोषित वंचित समाजाचा जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त प्रांत अभिजित थोरबोले यांनी केले.
रावेर दि.१प्रतिनिंधी(अजीज शेख)दलित शोषीत वंचित समाजाचा जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी समाजातील जबाबदार कार्यकर्त्यांनी कार्यकेले. पाहीजे असा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांत अधिकारी डॉ. अभिजित थोरबोले यांनी रावेर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिला.
सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेाडकर यांच्या पुतळयाजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे हातुन करुन दिप,व धुप पुजाकरुन अभिवादन करण्यात आले.पुढे थोरबोले असे म्हणाले की,एकुणच सर्व बहुजन समाजातील आर्थिक,शैक्षणिक प्रगती झाली पाहीजेहेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा संदर्भ देत समता स्वतंत्र्य ,बंधुता व न्याय या आधारावर रचना व्हायला पाहीजे .यावेळी माजी.नगरसेवक ॲङ.योगेश
गजरे,मुख्याधिकारी रविंद्र लांडे,कामगार नेते दिलीपजी कांबळे चिमुकली ममता चुडामण वैराग यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे ,यावल तहसिलदार जितेंद्र कुवर,नायब तहसिलदार संजय तायडे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोळे,नगराध्यक्ष दारामोहम्मद जफर मोहम्मद,माजी.नगराध्यक्ष हरिष गनवाणी,माजी नगराध्यक्ष पद्माकर
महाजन,नगरसेवक जगदीश घेटे,कॉग्रेस अ.जा.जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष राजुभाऊ सवर्णे, भारिप बहुजन महासंघ ता.अध्यक्ष बाळु शिरतुरे,ङि.ङि वाणी सामाजिक समता मंच कार्याध्यक्ष उमेश गाढे,भारिप बहुजन महासंघाचे जिल्हासचिव महेश तायडे,रतन भालेराव,
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव जयंतीचे गणेश रणशिंगे,रविंद्र सोनवणे,रमेश रणशिंगे, फकिरा सोनवणे,
तुकाराम रणशिंगे, आनंद सोनवणे,महेंद्र रणशिंगे, संतोष सोनवणे,अनिल रणशिंगे, प्रमोद सोनवणे,आकाश सोनवणे,प्रभाकर बि-हाडृं, विशाल बि-हाडे,रमेश सोनवणे,चुडामण वैराग,नरेंद्र सपकाळे,वंदना रणशिंगे, आशाबाई रणशिंगे, कमलाबाई रणशिंगे,
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघरक्षक तायडे यांनी तर आभार फुले ,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा