Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
रक्षाबंधन पर्वाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने "महिला सन्मान महोत्सव" आयोजन करण्यात आले होते.
रक्षाबंधन पर्वाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने "महिला सन्मान महोत्सव" आयोजन करण्यात आले होते.
रक्षाबंधन पर्वाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने "महिला सन्मान महोत्सव" आयोजन करण्यात आले होते.भाजपचे जिल्हा सरचिटणीस कामराज निकम याच्या अध्यक्षतेखाली माळीच ता.शिंदखेडा येथे बैठक संपन्न झाली.
बैठकीचे आयोजन भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा संजीवनी सिसोदे व सरपंच कुसूमबाई ठाकरे यांनी केले होते .
कार्यक्रमांचे प्रास्ताविक संजीवनी सिसोदे यांनी केले .सरकारने पाच वर्षे महिलांसाठी केलेल्या कामांची थोडक्यात माहिती दिली. जननी सुरक्षा योजना,मातृत्व सन्मान योजना,उज्वला,सुकन्या व भाग्यश्री यासारख्या अनेक योजना सरकार महिलांसाठी राबवत आहे. याच बरोबर अनेक सोयी सवलती उपलब्ध करून देत आहे .
रक्षाबंधनाचे औचित्य साधून या सर्व योजनांची एकत्रीत माहिती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याचे महिला भगिनींना रक्षाबंधन निमीत्त शुभेच्छा पत्र महिला पर्यंत पोहचविण्याचा संकल्प प्रदेश महिला मोर्चाने केला आहे . 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कालावधीत "शक्ती सन्मान महोत्सव" चे आयोजन केले आहे या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातून 21 लक्ष राखी संकलन केले जाणार आहे. या एकत्रीत राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याना बांधण्याचा/ सुपूर्द करण्याचा कार्यक्रम 16 ऑगस्ट रोजी षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्याचा सन्मान प्रत्येक विभाग व समाज गटातील महिला प्रतिनिधीला मिळणार आहे. तरी सर्व भगिनींना मुख्यमंत्र्यांना राखी व शुभेच्छा पत्र द्यावेळ असे आवाहन त्यांनी केले
अध्यक्षीय भाषणात कामराज निकम यांनी महिला सन्मान महोत्सव या कार्यक्रमांचे कौतुक करून, मुख्यमंत्री यानिमित्ताने प्रत्येक महिला भगिनी पर्यंत पोहचविण्याचा व संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्या सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी भाजप तालुकाअध्यक्ष नथा पाटील,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राम भदाणे,अनिकेत विजय पाटील,देवेंद्र पाटील,किशोर संघवी,बाजार समितीचे सदस्य मोतीलाल वाकडे,पंकज
कदम,वाघोदे सरपंच गोविंद वाघ,राहूल कचवे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम राबविण्यासाठी माळीचचे माजी सरपंच गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विश्वास पाटील, नंदू पाटील, रमेश पाटील, नानाभाऊ पाटील, संगीता महाजन, आशाबाई ठाकरे, गिताबाई ठाकरे यांनी विषेश परीश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा