Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

वैजापूर येथील दोन आदिवासी बहिणीवर अत्याचार




प्रतिनिधी (विनोद निकम )
तालुक्यातील वैजापूर कडून कर्जाणे या गावाकडे जाण्याच्या रस्त्या पासून पाचशे मीटर अंतरावरील शेतात घडली. गावातीलच देवेंद्र राजेंद्र मोरे (भोई वय- 22)याने गावातीलच दोन अल्पवयीन मुलीवर या नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वैजापूर येथील दोन अल्पवयीन चुलत बहिणीवर देवेंद्र मोरे याने गावाजवळील शेतात अत्याचार केले त्या पैकी एक बालिका अत्यवस्थ असून तिच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान रात्री पोलिसांनी १२:३०वाजता आरोपी नराधमास घटक केली आहे व त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.

पीडित मुलींपैकी एक पाच वर्षीय तर दुसरी सहा वर्षाची आहे या दोन सख्या चुलत बहिणी असून त्यांना या नराधमाने मुलींना गोड गोड बोलून मोटरसायकल वर बसवून रात्री ८:३०च्या सुमारास शेतात नेले होते. तेथेच त्याने दोन्ही बहिणीवर व एक पळून जाण्यास यशस्वी ठरली .

बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकून त्या दिशेने गावकऱ्यांनी धाव घेतली व तेथून अपराधी पळून गेला.दरम्यान डॉ चंद्रकांत बारेला यांनी बालिकांना वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.दोन्ही बहिणी पैकी सहा वर्षीय बालिका गंभीर जखमी आहे. आरोपीने मारहाण केल्यामुळे त्यांच्या अंगावर चेहऱ्यावर जखमा आहेत .

रात्री घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहाय्यक पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,चोपडा ग्रामीण चे पोलिस निरीक्षक भीमराव नंदूरकर, चोपडा शहर चे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे ,पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस अटक केली सदर गुन्हयाची आरोपीने कबुली दिली आहे..

पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सुद्धा घटनास्थळी पाहणी करून तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. घटनेचा प्राथमिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे यांनी केला .घटनेचा पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे हे करत आहेत. घडलेल्या घटनेबाबत गावात भीतीचे तसेच संतापाची लाट आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध