Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९
आदिवासी दिनी मिळाला महाराष्ट्र शासनाचा "उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार"
आदीवासी दिनी नागपूर येथील शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी आश्रमशाळेतील शिक्षीका श्रीमती कल्पना सोनवणे व शिक्षक शरद सुर्यवंशी यांना आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नागपूर येथे दि ९ रोजी आदिवासी दिनी शासनाच्या वतीने आदिवासी मंत्री अशोक उईके,आदीवासी विकास प्रकल्पाचे प्रधान सचिव मनिषा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात विविध आश्रमशाळेतील वेगवेगळ्या उल्लेखनीय कामगिरी
करणाऱ्यांंना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यात आश्रमशाळेतील आदीवासी विद्यार्थ्यांचा मातृभाषेकडून राज्यभाषेकडील प्रवास सुकर व्हावा यासाठी पाठ्यपुस्तकाचे भाषांतर
करण्याच्या आदीवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रयत्नात शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी येथील आश्रमशाळेतील शिक्षीका कल्पना सोनवणे व शिक्षक शिक्षक शरद सुर्यवंशी यांनी उत्तम योगदान दिल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी
विभागामार्फत नेत्रदीपक कामगिरी केल्याने उत्कृष्ट शिक्षक चा पुरस्कार आदिवासी मंत्री अशोक उईके व आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रधान सचिव मनिषा शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.यावेळी रेवाडी आश्रमशाळेचे अध्यक्ष रवींद्र मालचे हे देखील उपस्थित
होते.पुरस्कार प्राप्त कल्पना सोनवणे व शिक्षक शरद सुर्यवंशी यांना प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे,प्राचार्य व्ही.ए.पाटील,शिक्षक हेमंत गिरासे आदींची वेळोवेळी मदत लाभली आहे.रेवाडी आश्रमशाळेतील दोन जणांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सर्वत्र शिक्षीका कल्पना सोनवणे व शरद सुर्यवंशी यांचे कौतुक केले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा