Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
बाभुळदे ग्रामपंचायत तर्फे जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्यासह पाणीशुद्धीकरण यंत्राचे वाटप
बाभुळदे ग्रामपंचायत तर्फे जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्यासह पाणीशुद्धीकरण यंत्राचे वाटप
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
शिरपूर तालुक्यातील जि. प. शाळा बाभुळदे येथे भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत बाभुळदेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्दिगुणित करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या
आरोग्याच्या दृष्टीने शुध्द पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पाणी शुध्दीकरण यंत्र ही शाळेस देण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच सौ. शारदाबाई सरदार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सदर प्रसंगी शाळेमार्फत करण्यात आलेल्या लोकसहभागाला प्रतिसाद देत गावच्या सरपंच सौ शारदाबाई पाटील , श्री. सरदार रघुनाथ पाटील तसेच सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री.आधार निकुंभे ,सौ रमाबाई आधार निकुंभे ह्यांनी मिळून शाळेतील डिजीटल वर्गास स्टाईल्स बसविण्याचे जाहीर केले. तसेच श्री. रघुनाथ नथ्थु पाटील व कृषिसेवक
श्री. किरण मुरलीधर पाटील यांनी रोख स्वरूपात शाळेस मदत दिली.
कार्यक्रमास उपसरपंच सौ. सुरेखा देविदास निकुंभे, ग्रामपंचायत सदस्य सौ. उमाबाई महेन्द्र पाटील ,आत्माराम धुडकू भिल, संजय पाटील , शांताराम महाजन यासोबत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक श्री. राकेश पाटील यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. भरत पवार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा