Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
पूरग्रस्तांसाठी आहेर ऑटॉप्राइमतर्फे २ लाख ५१ हजारांची मुख्यमंत्री निधी साठी मदत
कल्याण : (मनोज भावसार) कोल्हापूर, सांगली व लगतच्या भागातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आहेर ऑटॉप्राइम कल्याणच्या संपूर्ण कर्मचारीवर्गाने एका दिवसाच्या वेतनाचे योगदान ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी’ साठी मदत म्हणून दिले आहे. कोल्हापूर सांगली या भागात पूरपरिस्थितीनंतर नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून हे नुकसान भरून
काढण्यासाठी सर्वच स्तरातून त्यांना मदत केली जात आहे. समाजाप्रती आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेतून कल्याणच्या आहेर ऑटॉप्राइमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले आहे. यामध्ये या कर्मचाऱ्यांचे वेतन १ लाख तसेच संस्थेच्या मालकांच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजार असे एकूण दोन लाख एक्कावन्न हजारांचा धनादेश कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे देण्यात आला. आहेर ऑटॉप्राइमच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदत म्हणून पूरग्रस्तांना दिला असून
सांगली कोल्हापूर याठिकाणी झालेल्या हानीतून येथील नागरिकांनी लवकरात लवकर सावरावे अशी भावना आहेर ऑटॉप्राइमचे जनरल मॅनेजर स्वप्नील भवसार यांनी व्यक्त केली. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वप्रथम आमच्या
कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कर्माचारयांनी हि संकल्पना व्यवस्थापना समोर मांडल्यानंतर आम्ही देखील त्याला संमती दर्शवित व्यवस्थापनाच्या वतीने देखील मदत केली असून अशाप्रकारे शासनाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही नक्की करू अशी प्रतिक्रिया आहेर ऑटॉप्राइमचे एच.ओ.डी. सोमेन घोष यांनी दिली. तर सामजिक बांधिलकी, समाजाप्रती आपले असलेले ऋण
फेडण्याच्या दृष्टीने या भावनेतून केलेल्या मदतीबद्दल शासनाच्या वतीने आभार मानत असून हि मदत केवळ पूरग्रस्तांना मदत नसून या मदतीद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांची एकता, सात्विकता कल्याणकरांना आणि प्रशासनाला दिसल्याचे तहसीलदार दिपक आकडे यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा