Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

आज जि.प.शाळा कुसुंबे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला.




रावेर प्रतिनिधी अजीज शेख रावेर  तालुक्यातील कुसुंबा येथे
यावेळी जि.प.शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तंबाखू मुक्त व,बालहक्क संरक्षण याबद्दल शपथ घेण्यात आली.त्या बरोबरच मूलांची भाषणे व देशभक्तीपर सामूहिक गीते मुलांनी सादर केली.चि.चेतन महाजण याने इंग्रजी मधून केलेले भाषण व कु.आफरिन सलिम तडवी हिने केलेले भाषण मनाला चटका लावून गेले "बेटी बचाव बेटी पढाव"चा नारा तिच्या भाषणातून उपस्थितांना दिला 

गेला.टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांनी व पालकांनी दाद दिली.शाळेत वर्षभर राबविण्यात आलेले विविध उपक्रम,शाळेचे अंतरंग व बाह्यांग यामंध्ये घडवून आणलेला आमूलाग्र बदल यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली,उपस्थिती वाढली.पालकांनी आमच्या वर दाखविलेला विश्वास  व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम व त्यामुळे, गुणवत्तेचा उंचावलेला आलेख यामुळे मागील वर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी 25 मुले व या वर्षी 15 मुले आपल्या कुसुंबे शाळेत पुन्हा परत येऊन दाखल झाली.हे सर्व आपल्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी मा.विजय पवार साहेब, शि.वि.अधिकारी मा.नवाज तडवी साहेब,शा.पो.आ.अधिक्षक मा.अजित तडवी साहेब ,सर्व केंद्रप्रमुख, 

मुख्याध्यापक, व समर्पण भावनेने काम करणारा माझा शिक्षक मित्र परिवार तसेच कुसुंबे गावातील सरपंच सलिम तडवी,मुबारक तडवी सर,नारायण भाऊ घोडके,अर्जुन भाऊ महाजण, व इतर शिक्षणप्रेमी नागरिक या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने शक्य झाले.आपल्या कुसुंबे शाळेला "आदर्श शाळा पुरस्कार" जाहीर झाल्याने जे.एस.जावळे विद्यालयाचे सचिव श्री नारायण भाऊ घोडके,सरपंच सलिम तडवी,मुबारक तडवी सर या सर्वांनी मुख्याध्यापक श्री दिलीप पाटील सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध