Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९
दोंडाईचा शहरात काँग्रेस पक्षाला मोठा हादरा
काँग्रेस शहराध्यक्ष मनोज तेली सह माजी नगरसेवक जितू गिरासे, नथु धनगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला भाजपात प्रवेश
(प्रतिनिधी)शिंदखेडा मतदारसंघात काँग्रेस पक्षातून भाजप मध्ये येणाऱ्याची गर्दी कमी होत नसून ती आणखीनच वाढत आहे साक्री बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, शिंदखेडा शहराचे माजी
उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख यांच्यानंतर आता दोंडाईचा शहरातील काँग्रेस शहराध्यक्ष मनोज तेली, माजी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे, नथु धनगर, माजी नगरसेवक रमेश बोरसे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती मनोज मालू, काँग्रेसचे सरचिटणीस शहाबाज शाह, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू धनगर, मुश्ताक शेख, लाला बागवान, नानाभाऊ पाटील,दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो काँग्रेसच्या
पदाधिकाऱ्यांनी ना जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला यामुळे दोंडाईचा शहरात काँग्रेस पक्षाला यांच्या निमित्ताने मोठा हादरा बसला आहे
शिंदखेडा मतदारसंघात जयकुमार रावल यांनी अतिशय नियोजनबद्ध विकास करून बुराई नदी बारमाही करणे, तापी नदीच्या काठावरील 22 उपसा योजनांना निधी आणणे, दोंडाईचा आणि शिंदखेड्यात आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी,
याशिवाय प्रत्येक गावात वेगवेगळ्या योजनांचा आणलेला निधी ,शिंदखेड्यात जवळपास 5 हजार लोकांना सिंचन विहिरी, त्यातून शेतकरी मोठा समाधानी असून जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामामुळे प्रत्येक गावाच्या शिवारात
अडलेले पाणी त्यातून भविष्यात होणारा विकास पाहता काँग्रेसने मागील काळात असे कोणतेही धोरण आखले नसल्याने जनतेचा काँग्रेस पक्षावर रोष असल्याने केंद्रप्रमाणेच राज्यात देखील काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्याची भावना नवीन भाजपात येणाऱ्यांनी आपल्या मनोगता तुन व्यक्त केले
ना जयकुमार रावल यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत करून पक्षात प्रवेश दिला
(बूथ लावणाऱ्यांनीच पक्ष सोडल्याने काँग्रेसची वाताहत)
माजी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे
दोंडाईचा शहरात काँग्रेसचे बूथ लावण्याची जबाबदारी आज प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची होती आज बूथ लावणारेच भाजपमध्ये गेले असल्याने काँग्रेस पक्षाची दोंडाईचा शहरात वाताहत झाली असून आता विधानसभा निवडणुकीत 1 लाखापेक्षा अधिकच्य मताधिक्याने ना जयकुमार रावल यांचा विजय होईल असा विश्वास माजी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे यांनी व्यक्त केला.
(बापू महाजन ही भाजपच्या वाटेवर)
रामी गावाचे माजी सरपंच, समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष, शिंदखेडा तालुक्याची कॉंग्रेसची बुलंद तोफ बापू महाजन हे ही भाजपाच्या वाटेवर असून आज झालेल्या पक्ष प्रवेशावेळी ते उपस्थित होते, लवकरच रामी गावात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा