Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
रावेर येथे भारिप बहुजन महासंघाची तालुस्तरीय महत्वपुर्ण बैठक उत्साहात संपन्न.
रावेर दि.१८प्रतिनिंधी अजीज शेख आज रविवार रोजी भारिप बहुजन महासंघाची तालुका स्तरीय बैठक रावेर येथे सकळी १:३० वाजता नविन विश्राम गृह (रेस्ट हाऊस) सावदा रोड रावेर या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाचे जि.अध्यक्ष
विनोदभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतखाली संपन्न झाली. या बैठकीला भारिप बहुजन महासंघाचे जि.सरचिटणीस दिनेशभाऊ इखारे,जि.युवक अध्यक्ष बाळाभाऊ पवार,अरुण नरवाडे यांनी बैठकीत पक्षाचे ध्येय धोरण याबाबत माहीती कार्यकर्त्यांना दिली.अध्यक्षीय भाषणात विनोदभाऊ सोनवणे म्हणाले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी कार्यकर्त्यांनी
आतापासुन केली पाहीजे. कारण श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये संपुर्ण महाराष्ट्रात २८८ जागा भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन महासंघाच्या माध्यमातुन लढविणार असुन सर्व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबाच्या आदेशाचे पालन करुन कामाला लागावे या संदर्भात कार्यकत्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
भारिप बहुजन महासंघाचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांनी रावेर तालुक्यातील ३०८ बुथ याची यादी प्रदेश कार्यालयात एक महिना आदी पासुन पाठविलेली आहे.रावेर तालुक्यातील ज्वंलत प्रश्नावर लवकरच पक्षाच्या वतीने जनआंदोलन करण्यार येणार आहे.गोर गरीब व वयोध्दाच्या समस्या जाणुघेतल्या जातील व आंदोलनाची रुपरेषा आखली जाईल.
या बैठकीला भारिप बहुजन महासंघाचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे,प्रकाश महाले,रफीक बेग,सलिमशाह,राहुल गाढे,उमेश सवर्णे, नितीन अवसरमल ,विजय मोरे, आकाश तायडे,,अर्जुन वाघ, संदिप सवर्णे, अक्षय गाढे, ज्ञानेश्वर तायडे,राजु तायडे,विनय गाढे,अजय सवर्णे,अक्षय गाढे, मो.जुबेर,तरुण गाढे,सिताराम वानखेडे, राहुल भालेराव, गौतम अटकाळे,यांच्यासह असंख्ये कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा